महाराष्ट्र

मला तोडण्याचा प्रयत्न झाला पण मी शर्यतीत राहणारच –पंकजा मुंडे

सावरगाव — मला तोडण्याचा प्रयत्न झाला. माझं राजकारण संपल्याचा अपप्रचार करण्यात आला. पण मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांनाही उत्तर देईन,” असा इशारा पंकजा मुंडेनी विरोधकांना दिला. त्या सावरगाव येथील दसरा मेळाव्यात बोलत होत्या.

सावरगाव येथील भगवानगडावरून प्रथमच ऑनलाइन दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या म्हणाल्या कीकुठलीही व्यक्ती पक्षापेक्षा मोठी होऊ शकत नाही पक्षाचा विचार मोठा असतो पण गोपिनाथ मुंडे साहेब हे पक्षापेक्षा मोठे झाले.त्यामूळेच विरोधी पक्षातील लोकही त्यांच नांव घेतात. असं सांगतानाच मी कुठल्याही कर्जातून मुक्त व्हायला तयार पण तुमचं कर्ज मला हवं आहे. हो मी तुमची कर्जदार आहे, तुम्ही देनदार आहात आणि मी कर्जदार, हे नातं असंच राहू द्या. ‘जिंदगी की रेस में जो आपको दौडकर हरा नहीं सकते, वो आपको तोडकर हरानेकी कोशिश करते हैं’, मी कितीही धावायला तयार आहे, पण तुटायला तयार नाही,” असं म्हणत पंकजा मुंडेंनी विरोधकांवर निशाणा साधला. ठाकरे सरकारने दिलेले पॅकेज हे पुरेसे नसून आणखी त्यात वाढ करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. ऊसतोड कामगारांचा प्रश्न शरद पवारांच्या कोर्टात असून त्यांनी योग्य न्याय द्यावा असंही त्यांनी यावेळी सांगितलं.आतामंत्रालयाच्या चकरा मारु नका, त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचा, त्याच्यापर्यंत मदत पोहोचवायचं काम करा. शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचं आहे. यंदा आपला दसरा मेळावा दरवर्षीप्रमाणं होऊ शकला नाही. यंदाचा मेळावा झाला ते जाऊ द्या, पुढच्या वर्षी आपण सर्व रेकॉर्ड तोडू. एकदा आपल्याला शिवाजी पार्क भरवायचं आहे. मी महाराष्ट्रभर दौरा काढणार आहे. कधी स्वप्नातही भाजपाचं सरकार येईल असं वाटत नव्हतं, तेव्हा मुंडे साहेबांनी भाजपाचं काम केलं. मित्रांसोबत बसलेले असताना ‘एक दिवस शिवाजी पार्क सभा घेणार. मुंडे साहेबांच्या संघर्ष यात्रेचा समारोप शिवतिर्थावर झाला. आज मी सांगतेय एक दिवस आपला हा मेळावा शिवतीर्थावर घेतल्याशिवाय राहणार नाही,” असा निर्धार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close