देश विदेश

भारत नव्या विचारांचा गरज पडल्यास सीमोल्लंघनासही तयार — अजित डोवाल

ऋषिकेश — देशाच्या स्वाभिमानाचा प्रश्न निर्माण झाल्यास आम्ही सीमापार जाऊन युद्ध करू शकतो अशा कडक शब्दात शेजारी देशांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी इशारा दिला आहे. ऋषीकेश येथे गंगेच्या काठी असलेल्या परमार्थ निकेतन आश्रमाला त्यांनी भेट दिली. यावेळी डोवाल यांच्या हस्ते गंगा पूजन करण्यात आलं यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना म्हणाले की नवा भारत हा वेगळ्या विचारांच्या आहे. भारताने आतापर्यंत कधीही कोणावर हल्ला केला नाही मात्र आमच्या स्वाभिमानाचा प्रश्न निर्माण झाल्यास सिमाच नव्हे तर सीमापार जाऊन युद्ध करू शकतो. परंतु इतिहास साक्षी आहे की स्वार्थासाठी आम्ही कोणालाही डिवचले नाही. पण स्वाभिमान रक्षणासाठी कोणालाही सोडणार नाही. जगातील मोठमोठ्या संस्कृतीचे पतन झाल्याचे पाहिले आहे मात्र भारतीय संस्कृती ही जगात भिन्न असून शेकडो वर्षापासून परकीय आक्रमण आणि गुलामी सोसल्यानंतर देखील या देशाच्या संस्कृतीवर बाहेरची संस्कृती प्रभाव टाकू शकली नाही.अशा शब्दात त्यांनी भारतीय संस्कृतीचा गौरव केला. तसेच भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे अध्यात्मिक ताकत आहे. जवान भलेही भौतिक स्वरूपात सिमेच रक्षण करीत असला तरी देशातील लाखो करोडो लोक प्रत्यक्षात आपली संस्कृती आणि श्रद्धेसह राष्ट्राला जोडण्याचं काम करीत आहे.त्यामुळे परदेशी नागरिक भारतात अशी कोणती शक्ती आहे जी एका सशक्त राष्ट्राची निर्मिती करते हे पाहण्यासाठी येतात.
देशातील प्रत्येक तरुण हा सैनिक असून याच भावनेने आपल्याला सशक्त भारताची निर्मिती करावयाचे असल्याच त्यांनी यावेळी आवाहन केलं

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close