आपला जिल्हा

श्रीक्षेत्र पोहिचा देव येथील दसऱ्याची यात्रा रद्द

बीड — श्रीक्षेत्र पोहीचा देव येथे प्रतिवर्षी विजयादशमीच्या निमित्ताने पालखी मिरवणूक नेते निघते. आणि यात्रा महोत्सव साजरा केला जातो. दत्तात्रेय प्रभूची पालखिला हजारावर लोक जमा होतात. मात्र यावर्षी कोरोना महामारी मुळे हा सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना देवस्थानाचे प्रमुख रंगनाथ गपाट बाबा यांनी म्हटले आहे की, पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी यावर्षी दसऱ्याच्या दर्शनाला श्री क्षेत्र पोहीचा देव येथे येऊ नये. कोरोणामुळे मोठ्या प्रमाणात समाज एकत्र येणे धोक्याचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी आणि दसऱ्यानिमित्त कोठेही गर्दी न करता सुरक्षितता बाळगावी.

त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे आणि शासनाच्या आदेशाचे पालन करून देवस्थान बंद करण्यात आले आहे. दसऱ्याच्या दिवशी श्री क्षेत्र पोहीचा देव येथे कोणीही दर्शनासाठी येऊ नये. शासन आदेशाप्रमाणे देवस्थान बंद राहणार आहे याची नोंद भाविकांनी घ्यावी..

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close