क्राईम

पाटोदा जवळ ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱा टेम्पो जाळला

पाटोदा — ऊसतोड कामगारांचे आंदोलन अधिकच चिघळत असून याला ऊस तोड कामगार बळी पडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. चार-पाच दिवसापूर्वी आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऊसतोड कामगारांच्या टेम्पोला आग लावली होती. अशीच घटना शुक्रवारी दुपारी पुसद तालुक्यातील मजुरांना जामखेड कडे घेऊन जाणाऱ्या टेम्पोला पाटोदा जवळ असलेल्या अनपटवाडी येथे मजुरांना खाली उतरून चालकास मारहाण केली व टेम्पोला आग लावण्याची घटना घडली.
सध्या विविध मागण्यांसाठी ऊस तोड मजूर वाहतूकदार यांच्या आंदोलन सुरु आहे.हा संप दिवसेंदिवस वाढत असून अद्याप यावर तोडगा निघाला नाही. हा संप सुरू असतानाच या आंदोलनाला हिंसक वळण लागत असल्याचे पहावयास मिळत आहे‌. जामखेड तालुक्यातील आपटी येथील मुकदम गोरे यांनी वाशिम व पुसद भागातील ऊसतोड मजुरांना वीस लाख रुपये उचल दिली होती. शुक्रवारी या मजुरांना टेम्पो क्र. एम एच 11 ए एल 34 26 मधून जामखेड कडे घेऊन येत असताना हा टेम्पो पाटोदा जवळ असलेल्या अनपटवाडी भागात आला असताटेम्पो तील मजुरांना खाली उतरवून टेम्पो चालकाला मारहाण केली तसेच टेम्पो पेटवून देण्यात आला. या टेम्पो मध्ये चोवीस मजूर तसेच आठ ते दहा लहान मुलांचा समावेश होता. याबरोबरच करण शेळके या मुकदमा जवळ असलेली सहा लाख रुपये टेम्पोत राहिल्यामूळे टेम्पोला आग लावली त्यामध्ये जळून गेले.परंतू अनपटवाडी जामखेड च्या हद्दीत असल्यामुळे याप्रकरणी जामखेड पोलिसांमध्ये गून्हा दाखल करण्यात येणार असल्याचे मुकादमाने सांगितले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close