राजकीय

अखेर चर्चेला पूर्णविराम एकनाथ खडसे राष्ट्रवादीत

मुंबई — गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे पक्ष बदलणार असल्याची चर्चा होती.अखेर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.एकनाथ खडसे यांनी परवा भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.यावेळी प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ,अनिल देशमुख यांच्या सारखे दिग्गज नेते उपस्थित होते.
खडसे यांच्या सोबत किती नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार याबाबत उत्सुकता होती.एकनाथ खडसे यांच्या सोबत तब्बल ७२ नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी पण राष्ट्रवादीत प्रवेश केला.
एकनाथ खडसे यांच्यासोबत नंदुरबार तळोदाचे माजी आमदार नरेंद्र पाडवी, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे – खेवलकर, बोदवडचे कृषी उत्पन्न बाजार सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगरचे सभापती प्रल्हाद जंगले, बोदवडचे सभापती किशोर गायकवाड, भुसावळचे सभापती मनिषा पाटील, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सुर्यवंशी, जळगाव जिल्हा दूध फेडरेशनचे अध्यक्षा मंदाताई खडसे, मुक्ताई सहकारी सुतगिरणीचे उपाध्यक्ष राजू माळी, औरंगाबादचे माजी महापौर सुदाम सोनवणे अशा 72 नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close