आपला जिल्हा

वडवणी तालुक्यात चप्पू उलटून तीन जण बुडाले

बीड — शेतातून घरी येत असताना जोराच्या वाऱ्यामुळे बोटीने हेलकावे खाल्ले यात पाच जण पाण्यात पडले त्यातील दोघे जण पाण्या बाहेर आले मात्र आईसह दोन मुले पाण्यात बुडाल्याची घटना वडवणी तालुक्यातील खळवट लिंबगाव मध्ये घडली

वडवणी तालुक्यामधील खळवट लिंबगाव येथे माजलगाव प्रकल्पाच्या बॅक वॉटरने विळखा घातला आहे. धरण 100 टक्के भरल्याने धरणातील पाणी दूरवर पोहोचले आहे, त्यामूळे या गावातील लोकांना शेतात जाण्यासाठी बोटीचा आधार घ्यावा लागत आहे. आज सायंकाळी पाच जण आपल्या शेतातून गावाकडे बोटीतून येत असताना जोरदार वाऱ्यामुळे बोटीने हेलकावे खाल्ले यात बोट पलटल्याने त्यातील पाच जण पाण्यात पडले त्यातील दोघे जण पाण्याबाहेर येण्यात यशस्वी झाले मात्र आई अन दोन मुले मात्र पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली.

या घटनेची माहिती कळताच वडवणी चे तहसीलदार श्रीकिसन सांगळे , मंडळ अधिकारी , तलाठी , पोलीस प्रशासनाने खळवट लिबगाव कडे धाव घेतली, सोबत शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख विनायक मूळे अन युवा सेनेचे पदाधिकारी वाचीस्ट शेडगे यांनी ही मदतीसाठी धाव घेतली आहे. सुषमा भारत फरताडे वय 30, आर्यन भारत फरताडे 5 अन त्यांची भाची वय 7 या तिघांचा शोध सुरू आहे. या घटनेने खळवट लिबगाव मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close