क्राईम

सामूहिक बलात्कार प्रकरणातील चौघांना जन्मठेप

बीड — गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे एका महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी चार आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत महाजन यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे ‌.
गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे 22 वर्षीय महिलेवर पाच वर्षापूर्वी शेतातून घरी जात असताना एरंडगाव शिवारात तसेच पीडितेच्या घराजवळ सामूहिक बलात्कार झाला होता. याप्रकरणी जिजा लालसिंग राठोड,अमोल मदन काष्टे, नवनाथ बाबुराव जाधव आणि कुंडलिक बन्सी राठोड यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. हे बीडच्या प्रमुख जिल्हा सत्र न्यायालयात प्रकरण चालले. अभियोग पक्षाच्या वतीने 10 साक्षीदार तपासण्यात आले. यात पिडीत महिलेसह वैद्यकीय अधिकारी, ओळख परेड घेणारे नायब तहसिलदार आणि तपासी उप विभागीय पोलीस अधिकारी गौरवसिंह यांची साक्ष महत्वाची ठरली.
सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरत प्रमुख सत्र न्यायाधिश हेमंत महाजन यांनी सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अभियोग पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता मिलींद वाघिरकर यांनी बाजु मांडली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close