आपला जिल्हा

माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याची व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडली

बीड — बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिकांचे पंचनामे करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत तातडीने मिळाली पाहिजे यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड तालुक्यातील अतिवृष्टी भागाचा दौरा करून पाहणी केली आणि आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुळजापूर येथे आले असता त्यांच्यासमोर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा मांडली

मराठवाड्यात बीड सह परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दोन दिवसांपूर्वीच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड तालुक्यातील काही गावांचा दौरा करून अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाहणी केली नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधून माहिती घेतली त्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले होते यावेळी तुळजापूर येथे आगमन झाल्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांना निवेदन देऊन बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा कळवली आहे या निवेदनात मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात यावर्षी सुरुवातीपासूनच पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे खरिपाची पेरणी यात कापूस सोयाबीन तुर बाजरी, मूग उडीद या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली होती यावर्षी बीड जिल्ह्यात 7 लाख 46 हजार 48 हेक्‍टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड झाली आहे हे प्रमाण सरासरीच्या 105.08% इतकी पेरणी झालेली होती तसेच काही चांगले आली होती परंतु झालेल्या अतिवृष्टीने कापूस सोयाबीन बाजरी ऊस या पिकांचे तसेच फळबागांचे आणि फुल बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच कापूस बोंडातच सडून गेल्यामुळे त्याच्या वाती सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे यावर्षी बीड जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 127.0 40% पर्जन्यमान झाले आहे त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बीड जिल्ह्यात पेरणी झालेल्या 7 लाख 46 हजार 84 हेक्‍टर क्षेत्रापैकी 90 हजार 363 क्षेत्रावरील कापूस सोयाबीन ऊस फळबागा यांचे प्राथमिक अंदाजानुसार 33 टक्के नुकसान झाले आहे असा कृषी विभागाचा अंदाज असून प्रत्यक्ष पिकांचे पंचनामे तातडीने झाल्यास क्षेत्रफळ वाढू शकते मराठवाड्यात गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे गेल्या अनेक वर्षापासून च्या दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे व आता पिके चांगली आलेले असताना अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा कणा तुटलेला आहे
मराठवाड्यात बीड जिल्ह्यातील शेतकरी संकटात असून शासनातर्फे तातडीने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी कोरोनाच्या महामारी चे संकट ओल्या दुष्काळाचे तांडव नृत्य यामुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे मराठवाड्यातील 275 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत सावकाराची देणे व बँकेचा कमी प्रमाणात कर्जपुरवठा यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याची शक्यता आहे वरील परिस्थिती पाहता दिवाळीपूर्वी आर्थिक मदत दिल्यास शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी साजरी होईल महाराष्ट्र शासनाच्या हमी भावाने कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात यावा व कापूस पूर्णपणे भिजला असून प्रति प्रमाणे कापूस स्वीकारण्यात यावा गेल्यावर्षी ग्रेड हा एकच ठेवण्यात येऊ नये कापसाची प्रत पाहून दर ठरविण्यात यावा व संपूर्ण कापूस हा शासनाने खरेदी करावा तसेच सौर ऊर्जा पंप या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना या योजनेत बीड तालुका वगळण्यात आला असल्यामुळे येथील शेतकऱ्यांना याचा फायदा होण्यासाठी ही योजना बीड तालुक्यासाठी पूर्ववत सुरू करण्यात यावी
बीड जिल्ह्यात संजय गांधी व निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गेल्या अनेक महिन्यापासून अनुदान देण्यात आलेले नाही त्याची रक्कम 42 कोटी 46 लाख 71 हजार 925 एक्के देणे बाकी असून वरील सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा व तातडीने निर्णय घेण्यात यावे अशी मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे यावेळी माजी आमदार बदामराव पंडित शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व शिवसेना नेते परमेश्वर तळेकर हे उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close