आपला जिल्हा

पुरवठ्यातला ठाणगे जात्यात तर अधिकारी सूपात ? ठाणगे च्या मग्रुरी ला लगाम कधी बसणार ?

बीड — मग्रूर मस्तवाल स्वभावाच्या जोरावर पुरवठा विभागात आलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर अरेरावीची भाषा ठाणगे कडून वापरली जात असल्यामुळे जनतेच्या रोषाला अधिकारी मात्र बळी पडत आहेत. आशा उद्दाम माणसाला वेळीच लगाम घातला गेला नाही तर ठाणगे जात्यात तर अधिकारी सुपात अशी अवस्था निर्माण होत असल्याचे चित्र सध्या तहसील कार्यालयात पाहायला मिळत आहे.
तहसीलदार निळे यांनी ठाणगे च्या या वृत्तीचा परिणाम लोकांनी केलेली चिखलफेक सहन केली. अखेर त्यांनी त्याची नेकनूर चा गोदामपाल म्हणून बदली केली. यावेळी पुन्हा निळे यांची मनधरणी करून तालुका पुरवठा विभागात कार्यरत राहण्याचा घाट घातला होता. मात्र याला यश येत नसल्यामुळे शेवटी सतरा-अठरा दिवसाच्या कालावधी साठी रजा टाकून वातावरण ठाणगे ने शांत होऊ दिले. परंतु सध्याची आणीबाणीची परिस्थिती असल्यामुळे नेकनूरच्या गोदामपाल म्हणून दुसर्‍याची नियुक्ती झाली गेली. पुन्हा आज रुजू झालेल्या ठाणगेनी खुर्चीवर मांड ठोकली असून त्याच्या कृष्ण कृत्याला बळ मिळाले आहे. रुजू होताच त्यांच्याकडे सोपवलेल्या कामाची पूर्तता करून घेण्यासाठी लोकांची रांग लागली. यातून पुन्हा नेहमीसारखी लोकांसोबत वादावादी सुरू झाली. तहसीलचा पुरवठा विभाग म्हणजे सध्या या माजी सैनिकाच्या कुस्तीचा आखाडा बनला आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकांची कामे त्यामुळे प्रलंबित राहत असून परिणामी लोकांच्या रोषाला अधिकाऱ्यांना बळी पडावे लागत आहे ‌ प्रसारमाध्यमांमधून देखील शेवटी अधिकाऱ्यांवर टीका होताना दिसून येत आहे. एकंदरच ठाणगे जात्यात असला तरी अधिकारी सुपात आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यावर तहसीलदार शिंदे काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close