महाराष्ट्र

मराठवाडयात चार हजार वीज चोरीचे आकडे पकडले

वीज चोरीमुळे गंभीर शिक्षाही होवू शकते

औरंगाबाद—  वीज चोरीच्या आकडयामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण मोठया प्रमाणात होवून महावितरणची आर्थिक हानी होत होती. वीज चोरीचे आकडे काढण्याचे आवाहन सहव्यवस्थापकीय संचालक डॉ नरेश गिते यांनी केल्यानंतर चांगला प्रतिसाद देत  कालपर्यंत मराठवाडयात 4,096 वीज चोरीचे आकडे महावितरण अभियंते व कर्मचा—यांनी काढले. वीज चोरांवर विघुत कायदयानुसार दंड व  गंभीर शिक्षाही होवू शकते. यामुळे आकडे टाकून वीज चोरी करणा—यांचे धाबे दणाणले आहेत.

आकडे टाकून वीज चोरी होत असल्याने रोहित्रावर अधिक  भार येवून रोहित्र मोठया प्रमाणात  नादुरूस्त  आहेत. रोहित्र नादुरूस्त झाल्यास  ते रोहित्र दुरूस्तीसाठी नेवून नवीन रोहित्र आणून  चालू करे पर्यंत त्या भागातील जनतेला, कृषीपंप शेतक—यांना विजेपासून अंधारात राहावे लागते. त्यामुळे नियमित विजेचे बिले भरणा—या ग्राहकांनाही अंधारात राहावे लागते.  महावितरणला  आकडे टाकून वापरण्यात येत असलेली अनधिकृत वीज व रोहित्र दुरूस्ती, रोहित्र ने आण करण्याच्या खर्चाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. यात महाविरतणला मोठे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत घरगुती, व कृषीपंपांचे  औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलातील सर्व शाखा कार्यालय व उपविभाग कार्यालय परिसरातील आकडे टाकून   होत असलेली वीज चोरी थाबंविण्यासाठी आकडे काढण्याचे आवाहन सहव्यवस्थापकीय संचालकांनी दिले होते. अभियंते व कर्मचा—यांचे पथक जोमाने कामाला लागून  काल पर्यंत औरंगाबाद परिमंडलात 1,089  वीज चोरीचे आकडे काढले. लातूर परिमंडलातील 1,940 वीज चोरीचे आकडे काढले. व नांदेड परिमंडलातील 1,067 वीज चोरीचे आकडे काढले. असे मराठवाडयात एकूण  4,096 वीज चोरीचे आकडे काढण्यात आले. 

          वीज चोरी पकडल्यानंतर ग्राहकांला वीज चोरी केलेल्या युनिटनुसार बिलाची आकारणी करण्यात येते. सदर  आकारणीचे बिल न भरल्यास सबंधितांवर गुन्हाही दाखल होवू शकते.   यामध्ये आकडे टाकून विजेचा वापर करणे, शेजा—याकडून अथवा अन्य मार्गाने विजेचा वापर करतांना महावितरण कर्मचा—यांना आढळून आल्यास संबंधित ग्राहकांवर विघुत कायदा 2003 नुसार कारवाई करण्यात येत आहे. यात थकबाकीदार ग्राहकाने शेजा—याकडून विजेचा वापर केल्यास व  शेजा—याने परस्पर वीज पुरवठा केल्यास दोघांवरही  कलम 126 नुसार कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये शेजा—याचे मीटरही बंद होवू शकते. व आकडा टाकून विजेचा वापर करणे, वाहिनीमध्ये छेडछाड करणे  अथवा अन्य मार्गाने विजेचा वापर केल्यास संबंधीत ग्राहकांवर कलम 135, 138 नुसार कारवाई करण्यात येते. पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होवून संबंधितांना अटकही होवू शकते. या वीज चोरीच्या प्रकरणात गुन्हा सिध्द झाल्यास तीन वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होवू शकते.  

 
     जनतेने  आकडे टाकून विजेचा वापर करू नये, शेजा—याकडून विजेचा वापर अथवा अन्य मार्गाने विजेचा वापर करू नये. मीटरमध्ये छेडछाड करू  नये.   वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेवूनच विजेचा वापर करावा, असे   आवाहन महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ नरेश गिते  यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close