आपला जिल्हा

चौसाळा एसबीआय शाखेची उद्दिष्टपूर्ती कडे वाटचाल

शाखाधिकारी संतोष जाधव यांची यशस्वी कामगिरी

चौसाळा — येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चौसाळा शाखेने ग्राहक सेवा केंद्राची मदत घेत कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून तर दिला दिला याबरोबरच नवीन पीक कर्ज उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे भर दिला. परिणामी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध झाल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
चौसाळा शाखेचे व्यवस्थापक संतोष जाधव यांनी लाॅक डाऊन च्या काळामध्ये दत्तक गावांची मोठी संख्या असल्यामुळे अतिशय नियोजनपूर्वक कर्ज प्रकरण उद्दिष्टपूर्ती कडे वाटचाल सुरू केली. एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे बँक शेतकऱ्यांना कर्ज देत नाही अशा तक्रारींचा ओघ सुरू असताना दुसरीकडे मात्र बँकेच्या सुविधांचा लाभ जास्तीत जास्त ग्राहकांना कसा मिळेल याकडे व्यवस्थापक जाधव यांनी लक्ष दिले. याबरोबरच ग्राहक सुविधा केंद्रांच्या माध्यमातून महा विकास आघाडी सरकारने दिलेली कर्जमाफी शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी यासाठी जनजागृती केली. वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज उपलब्ध उपलब्ध करून दिले माफी झालेल्या शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे देखील तात्काळ मार्गी लावली. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे कर्जमाफीच्या उद्दिष्टपूर्ती कडे वाटचाल करीत असताना बँकेतील इतर कर्मचाऱ्यांची मोलाचे साथ त्यांना मिळाली हे त्यांच्या कुशल नेतृत्वाची चूणूक आहे. कोविड परिस्थितीत बँकेत कमीतकमी गर्दी व्हावी शेतकरी राजा सूरक्षीत रहावा याची जाणीव ठेवत आवश्यक त्यावेळी शेतकऱ्यास फोन करून कागदपत्रांची पूर्तता करून घेतल्यामुळे शहरात रोगाचा संसर्ग वाढला असला तरी बँकेतील कर्मचारी व बँकेत येणारा ग्राहक दोन्ही आज पर्यंत या रोगापासून बाधित होऊ शकला नाही. शेतकऱ्यांनी देखील योग्य त्या नियमांचे पालन केल्यामुळे बाला घाटावर ही बँक उद्दिष्ट गाठण्यात प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी ठरली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close