आपला जिल्हा

बीड शहरातील विविध विकास कामांसाठी पाच कोटीचा निधी मंजूर – नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर

बीड — राज्य शासनाच्या वतीने नगर पालिकांसाठी वैशिष्टयपूर्ण योजनेतून विशेष अनुदानाची तरतूद करण्यात येत असते. बीड शहरातील सहा प्रभागातील रस्ते, नाली बांधकाम यासाठीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता, शासनाने त्यास मंजूरी दिली असून पाच कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे. लवकरच या कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करून ही कामे सुरू करणार असल्याचे ते म्हणाले.

सोमवार दि.19 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते, या सभेत विविध कामांना मंजूरी देण्यात आली असून बीड शहरातील सहा रस्त्यांची कामे व नाली बांधकामे करण्यात येणार आहेत. यामध्ये बीड शहरातील जुना मोंढा भागातील रस्ते व नाली, बालेपीर भागातील आघाव, राख यांच्या घरापासून ते सानप विद्यालयापर्यंत, मोमीनपुरा भागातील जी.एन.फंक्शन हॉल ते आदित्य कॉलेज नाथापूर रोड, वार्ड क्र.11 मधील मामू गल्ली ते जायकवाडी कॉलनी भिंतीपर्यंत, स्वराज्यनगरमध्ये रस्ता व नाली बांधकाम, शिवाजीनगर भागातील रस्ता व नाली बांधकाम असा समावेश आहे. त्याचबरोबर बीड शहरातील छत्रपती संभाजी राजे क्रिडांगण (मल्टी पर्पज) भाडे तत्वावर चालवण्यास देणे, बीड शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवणे तसेच शहरातील विविध भागात ओपन जीमच्या साहित्यास सुरक्षेसाठी काँक्रीट प्लॅटफॉर्म तयार करणे. नगरपालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये असलेल्या कार्यालयाचे गेट दुरूस्ती, पाईपलाईन दुरूस्ती व इतर कामे, स्टेशनरी साहित्य खरेदीस मंजूरी, शहरातील मुक्ता लॉन्स, डी.पी.रोडवरील नाला बांधकाम, त्याचबरोबर शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांची विद्यूत रोषणाई दुरूस्तीस मुदतवाढ देणे, पाणी पुरवठा विभागात मनुष्यबळ पुरवणे आणि महत्वाचे म्हणजे भाजी मंडई भागातील राज हॉटेल जालना रोडकडे जाणारा रस्ता व नाली बांधकामाला मंजूरी देण्यात आली आहे. या सर्व कामांच्या निवीदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करून कामाला प्रत्यक्षात सुरूवात करणार असल्याचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close