क्राईम

वैद्यनाथ बँकेचा चेअरमन अशोक जैन याला 2 दिवसाची पोलीस कोठडी

बीड — कळंब येथील व्यापाऱ्याची अडीच कोटी रुपयांची सीसी मंजूर करण्यासाठी पंधरा लाख रुपयाची लाच मागणारा व त्यातील दहा लाख रुपये स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले ला वैद्यनाथ बँकेचा चेअरमन अशोक जैन यास अंबाजोगाई न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या दूरदृष्टीतून उभा राहिलेल्या वैद्यनाथ बँकेच्या कारकिर्दीला पुन्हा काळिमा फासण्याचे काम चेअरमन असलेल्या अशोक जैन याने केलं. मुंडेनी जनहिताच पाहिलेल स्वप्न आता स्वहित जपण्यात परावर्तित झाल्याच आणखी एकदा उघडकीस आलं. कळंबच्या किराणा व्यापाऱ्याकडून तब्बल दहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना अशोक जैन यास औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्याला आज अंबाजोगाईच्या न्यायालयात हजर केले असा 21 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. स्व. मुंडे यांचे स्वप्न धुळीला मिळवत असताना कोणतीही कसर अशोक जैन याने सोडली नाही. कळंब तालुक्यात असलेल्या शंभू महादेव कारखान्याची तारण असलेली कोट्यावधी रुपयाची साखर त्याने परस्पर विकली होती. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता. नोट बंदीच्या काळात देखील वैद्यनाथ बँकेवर नोटा बदलल्याचा आरोप झाला होता. असं असताना देखील स्व. मुंडे यांच्या वारसाकडून त्यांची पाठराखण केली जात असल्याचे दिसून येत होते. शेवटी अशोक जैन यास अति तिथे माती या म्हणीचा प्रत्यय येत.एसीबीच्या जाळ्यात अडकला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close