आपला जिल्हा

परळीच्या 9 राशन दुकानदारांचे परवाने रद्द

परळी – परळी शहर व तालुक्यात रेशन धान्याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू होता. गोरगरिबांसाठी आलेले धान्य वाटप न करता धान्याचा अपहार केल्याप्रकरणी परळी शहरातील नऊ रेशन दुकानांचे परवाने रद्द केल्याने एकच खळबळ उडाली आहे.अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५९ हजारांच्या खाली आहे़ त्यांना शासनाकडून पिवळे रेशनकार्ड दिले जाते. त्याद्वारे गहू २ रुपये प्रतिकिलो, तांदूळ ३ रुपये प्रतिकिलो दिला जातो. अनेक कुटुंबांतील काही व्यक्तींची नावे रेशनकार्डमध्ये आहेत. आधारकार्ड रेशन दुकानदाराला दिलेली आहेत तरी ही त्यांना रेशनधान्य दुकानात धान्य देण्यास नाकारले जात होते. तर अनेकांना आधारकार्ड नाही म्हणून माल दिला जात नव्हता, तोच शिल्लक माल चौपट किमतीने इतर ग्राहकांना विकला जात होता.

या सर्व प्रकाराबाबत परळी येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील मस्के यांनी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कडे तक्रार केली होती.
रुटनॉमिनी च्या नावाखाली या रेशन दुकानदारांन कडून हजारो क्विंटल धान्याचा अपहार केला जात होता हे प्रकरण 2018 पासून सुरू होते.अखेर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या परळी शहरातील 9 भ्रष्ट रेशन दुकानदारावर कारवाई करण्यास भाग पाडले. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील प्रशासन तसेच पुरवठा विभागाकडून माहिती मागवली आणि तात्काळ या सर्व दुकानदारा विरुद्ध कारवाई केल्याने परळीसह जिल्ह्यातील भ्रष्टाचार करणाऱ्या रेशन दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे परळी शहरात अजूनही राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांकडे रेशन दुकानदारांचे लायसन्स आहेत.अशा दुकानदार कार्यकर्त्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना मोफत राशन तर दिलेच नाही परंतु त्यांना मिळणारे इतर धान्यही दिले जात नाही, हे सर्व धान्य काळ्याबाजारात विक्री करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो.अखेर त्या भ्रष्टाचाराला वाचा फुटली आणि अधिकाऱ्यांनी अशा भ्रष्ट रेशन दुकानदार विरुद्ध कारवाई केल्याने परळी आणि परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

या रेशन दुकानाचे परवाने झाले रद्द

शहरातील बरकत नगर भागात असलेले माजी नगराध्यक्ष जाबेरखा पठाण यांचे रेशन दुकान, अविनाश अदोडे भिमनगर ,नाथराव मुंडे सोमेश्वर नगर, संग्राम गीते चांदापूर, कमलेश जगतकर पंचशील नगर, हर्षद अदोडे भिम नगर, राजन वाघमारे इंद्रानगर, मधुकर जायभाये हलगे गल्ली, आणि उद्धव मुंडे गुरुकृपा नगर या स्वस्तधान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close