आपला जिल्हा

न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वृद्धेचा आत्मदहनाचा प्रयत्न

बीड — घरात संदर्भात त्रास देऊन बेदखल करण्याचा प्रयत्न केला जात असून या प्रकरणी पिंपळनेर पोलिसात तक्रार देऊन देखील न्याय मिळत नसलेल्या वृद्ध महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.मात्र चौकीतील पोलिसांनी तिला वेळीच रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

ढेकनमोहा येथील छबाबाई तुकाराम शिंदे या वृद्ध महिलेच्या मालकी व ताब्यात असलेल्या मिळकत क्रमांक 312/ 292 व घर क्रमांक 313/293 मधून बेदखल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यासंदर्भात वृद्ध महिलेने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. याच गावातील महादेव भानुदास थापडे, एकनाथ भानुदास थापडे तसेच संजीवनी आसाराम घोरड यांचा या जागेमध्ये कोणताही हक्क नाही. दोघांच्याही जागेच्या चतुर्सिमा वेगवेगळ्या आहेत. तसेच मिळकत देखील वेगळी आहे. असं असताना देखील हे तिघेजण संगनमताने त्रास देऊन जागेतून बेदखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या सुना बाळाचे अपहरण करून संबंधित व्यक्ती पासून आमच्या जीवाला धोका असल्याची तक्रार पिंपळनेर पोलीसांना दिली होती मात्र पोलिसांनी संबंधित व्यक्ती विरोधात कुठलीच कारवाई केली नाही. शेवटी या वृद्ध महिलेने आत्मदहनाचा इशारा दिला. तरीदेखील राजाराम स्वामींची पोलीस मूग गिळून गप्प बसली. अखेर छबाबाई शिंदे या वृद्ध महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close