आपला जिल्हा

चौसाळा पोलीस ठाणे बनले सेलिब्रेशन सेंटर, स्वामी असलेल्या राजा तला ‘ राम ‘संपला ?

बीड — राजा रामास्वामी यांनी पोलीस अधीक्षक पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर नवनवीन किस्से पोलीस ठाण्याचे बाहेर येत असल्याचे सध्या दिसून येत आहे. अवैध धंद्यांवर पांघरून घालाव यासाठी चौसाळा पोलीस ठाणं तर सेलिब्रेशन सेंटर बनत चालल्याचं उघडकीस आल आहे. यासंदर्भातील फोटो व्हायरल होऊन देखील अद्याप सेलिब्रेशन साजरा करणाऱ्या पोलिसांवर कुठलीच कारवाई झाली नसल्यामुळे सर्व पोलीस ठाण्यांचा स्वामी असलेल्या
‘ राजा’तला राम निघून गेला असल्याची चर्चा होत आहे.


जिल्ह्यात नंबर दोनचे धंदे सध्या जोरात सुरू असून राजारामा स्वामीच्या कारकिर्दीत कायद्यात व खाकी वर्दीत राम उरला नसल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळेच पोलीस ठाण्याला सेलिब्रेशन सेंटर बनवताना पोलिसांना जनाची नाही तर मनाची देखील लाज वाटत नसल्याचे उघडकीस आले आहे. तीन-चार दिवसांपूर्वी चौसाळा येथे एका कथित पत्रकाराचा ? वाढदिवस पोलीस चौकीतच मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे सध्या चौसाळा पोलीस रस्त्यावर दुकान थाटून बसलेल्या व्यापाऱ्यांकडून दररोज कलेक्शन करतात.

सोबतच दारू मटका जुगार यासारखे धंदे जोमाने सुरू आहेत. कोविडच्या काळात सर्व नियम पायदळी तूडवले जात असले तरी पैशापुढे कायदा मोठी गोष्ट नाही असंच जणू काही पोलिसांनी ठरवून घेतले आहे. या सर्व प्रकारांवर पांघरून घातले जावे यासाठी पोलीस ठराविक पत्रकार म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तीचे लाड करत चक्क पोलीस ठाण्यातच वाढदिवस साजरा करतात हे कुठल्या कायद्यात बसते वाढदिवसाचा केक चौकीत कापण्या पूर्वी मद्यधुंद अवस्थेत हा प्रकार घडला काय असे प्रश्न मात्र अनुत्तरितच आहेत.या प्रकारांमधून पोलिसांना काय साध्य करायचे होते हे न समजण्याइतकी जनता तर दुधखुळी नाहीच नाही पण पोलीस आधिक्षकही नाहीत.

चौसाळा पोलीस चौकी चे कर्मचारी असेच इतर पत्रकारांचे देखील वाढदिवस साजरे करणार काय ? की एवढाच पत्रकार? पोलिसांच्या जास्त फायद्याचा आहे ? पोलीस व नंबर 2 वाले यांच्यात दिलजमाई करून देणारा हा पत्रकार आहे ? पोलीस चौकी चा वापर लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी होणार की पांघरून घालणाऱ्या लोकांचे वाढदिवस साजरा करण्यासाठी होणार खरंच तो पत्रकार आहे की दलाल याचे उत्तर पोलीस अधीक्षक नक्कीच देतील अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे. 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close