आपला जिल्हा

खा.छञपती संभाजीराजे मंगळवारी ओला दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर!

बीड — परतीच्या पावसाने राज्यात मोठे नुकसान झाले आहे, यात शेतकरी बांधवांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे, याच शेतकर्यांना आधार देण्यासाठी व सरकार कडून बळीराजाला या संकटातून सावरण्यासाठी आर्थिक मदत सरकारकडून मिळावी यासाठी खासदार तथा छत्रपती शिवाजी महाराजांचे व राजर्षी शाहू महाराजांचे वंशज छञपती संभाजी राजे हे मराठवाड्याच्या दौर्यावर आहेत. उद्या ते बीडच्या दौऱ्यावर येत असुन जिल्ह्यातील अनेक गावांना ते भेटी देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
मंगळवारी दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सकाळी ९:०० वाजता राजे हे बीड तालुक्यातील नांदुर हवेली येथील शेतकरी गोपाळ धांडे व शंकर धांडे यांच्या शेताची व परिसराची पाहाणी करणार, ९:३० ला गेवराई
तालुक्यातील कुंभारवाडी, १०:३०ला सावरगाव, ११ ते १२:३० कोळगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद व व शेतावरच जेवण, दुपारी १:०० वाजता वडगाव ढोक, २:०० ला पांगरी मार्गे गोविंदवाडी, २:३० ला तलवाडा येथील शिवकालीन त्वरिता देवीचे दर्शन, ३:०० ला आनंदवाडी, ३:३० ला किणगाव, ४:०० गेवराई येथील पुजा मोरे यांच्या आॅफिस मध्ये एमपीएससीची तयारी करणा-या विद्यार्थ्यांशी व गेवराईतील पत्रकार बांधवांशी संवाद साधणार आहेत तसेच सायंकाळी ४:३० वाजता बीड येथील शासकिय विश्रामगृह येथे पञकार परिषद, ५:०० वाजता शासकीय विश्रामग्रह बीड याच ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व सर्व मराठा संघटनांशी इतर सर्व संघटना सर्वपक्षीय कार्यकर्ते,नेते,सर्वसामान्य जनता,शेतकरी,अठरापगड जाती धर्मातील समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत, सायंकाळी ६:०० वाजता मोरगाव येथे शेतकरी संवाद साधणार आहेत री या दौर्‍यात सर्व शेतकरी समाज बांधव व अठरापगड जाती धर्मातील कार्यकर्ते पदाधिकारी व संबंधितांनी उपस्थित रहावे यासर्व गावांना भेट़ी देऊन राजे मुंबई कडे रवाना होतील. अशी माहिती त्यांचे कोल्हापूर मध्यवर्ती कार्यालयातील अमर पाटील,सोमनाथ लांबोरे,योगेश केदार,अजय पाटील आदींनी दिली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close