क्राईम

ऊस तोडणी मजूरांची वाहतूक करणारा टेम्पो जाळला, स्वार्थासाठी राजकारणी मजुरांना कुठपर्यंत मारहाण करणार ?

आष्टी — कोल्हापूर येथील पंचगंगा साखर कारखान्यावर टेम्पोने ऊसतोड मजूर जात असताना आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्यानंतर चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी ऊसतोड कामगारांना मारहाण करत खाली उतरवले व टेम्पोला आग लावण्यात आली. पैठण तालुक्यातील आगर नांदड येथील हे ऊसतोड मजूर होते.
पैठण तालुक्यातील आगर नांदड येथील ऊसतोड मजूर कोल्हापूर येथील पंचगंगा साखर कारखान्याकडे ऊसतोडणीला टेम्पो क्र. एम.एच. 16 क्यू. 6788 ने जात होते. रात्री टेम्पो आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्यानंतर अज्ञात सात ते आठ जण एका चारचाकी वाहनातून आले व टेम्पोला गाडी आडवी लावून टेम्पोच्या काचा फोडल्या. आतमध्ये असलेल्या चालकाला व मजुरांना खाली उतरवून धक्काबुक्की करत मारहाण केली तसेच टेम्पोच्या टायरला आग लावत टेम्पो पेटवून दिला. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात चालक गोरख गुलाब अंगरख रा. खांबपिंप्री याच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात जाळपोळ, मारहाणीचा गुन्हा आज सकाळी दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, आष्टी पोलिस उपअधीक्षक विजय लगारे, पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे यांनी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सलीम पठाण हे करीत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close