महाराष्ट्र

‘तो ‘ पाऊस जाणता राजाच्या आयुष्यात राजयोग निर्माण करणारा ,तर आजचा पाऊस बळीराजाला भिकेला लावणारा

बीड — 1 वर्षापूर्वी आजच्या दिवशी सातारा येथे जाहीर सभेत जाणते राजे म्हणवले जाणारे शरद पवार पावसात भिजले. परिणामी शेतकऱ्यांनी मतदानाने त्यांची झोळी भरली. याच जोरावर या कसलेल्या मल्लाला राजयोग निर्माण करता आले. मात्र आता झालेल्या पावसात शेतकऱ्यांची स्वप्न भिजली आहेत. तो भिकेला लागला आहे. अशावेळी शरद पवार शेतकऱ्यांची झोळी सुद्धा भरीव मदतीच्या रूपाने भरणार का ? किमान दिवाळीचा दिवा तरी त्यांच्या घरात पेटेल का ? केंद्राच्या मदती कडेच बोट दाखवले जाणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
आजच्या दिवशी सातारा येथे जाणताराजा म्हणवले जाणारे शरद पवार यांची धुवाधार पावसात जाहीर सभा झाली. या जाहीर सभेनंतर राज्यातील सत्ता समीकरण पूर्णतः बदलली गेली. पावसातील या सभेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे बळीराजाने भावनिक होऊन मतदानाचे भरभरून दान जाणता राजा च्या झोळीत टाकले‌. परिणामी दृष्टीक्षेपात नसलेली सत्ता काँग्रेस शिवसेनेच्या मदतीने मिळवण्यात यश मिळाले. आज देखील तसाच पाऊस आहे. या पावसाने बळीराजाच्या स्वप्नांची धूळधाण केली आहे. सर्व आशा आकांक्षा पावसाने धूवून नेल्या आहेत. खरिपाच्या पेरणीच्या वेळी बोगस बियाणांनी शेतकऱ्यांच कंबरडे मोडलं. त्यातूनही कसाबसा उभा रहात शेतकऱ्याने अपार कष्टाच्या जोरावर जोमाने पीक आणलं निसर्गानेही चांगली साथ दिली. किमान आतातरी आपले दिवस पालटतील या आशेवर असलेल्या बळीराजाच स्वप्न परतीच्या पावसाने भंगल सोयाबीनचे ढिगारे वाहून जाताना सोशल मीडिया प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सर्वांनी पाहिले. पण तात्काळ ठोस मदतीची घोषणा करण्याऐवजी पाहणीच्या नावाखाली राजकीय दौरे सत्ताधाऱ्यांनी सुरू केले. यात जाणते राजे देखील मागे राहिले नाहीत. त्यांनीही आज बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. राजा म्हणवून घेणं आणि खरंच राजा असण यातला फरक देखील आज पुन्हा एकदा स्पष्ट झाला. जाणता राजा पावसात भिजतो आहे म्हटल्यानंतर बळीराजाने भरभरून मतदानाच दान दिलं. हा बळीराजाचा मोठेपणा तर प्रसारमाध्यमांमधून पिकांची झालेली नासाडी स्पष्ट दिसत असली ती प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली असली तरी मी तुमच्या पाठीशी आहे घाबरू नका अस अवडंबर निर्माण करत राज्य सरकारला मर्यादा आहेत. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन केंद्राकडे मदतीची मागणी करणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. बोगस बियाणांमूळे दुबार पेरणी च संकट आलं त्यावेळी देखील जाणता राजा ने बळीराजाची झोळी रिकामीच ठेवली आज देखील तशीच स्थिती निर्माण होते की काय? दिवाळीच्या सणात शेतकऱ्याच्या झोपडीत आशेचा दिवा पेटेल काय असा प्रश्न बळीराजाकडून विचारला जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close