महाराष्ट्र

सोमवारी नुकसानग्रस्त भागाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौरा करणार

मुंबई — मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रभागात परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे.पूर परिस्थिती मूळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मूख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्षनेते शेतकऱ्यांच्या खात्यावर जात असताना मुख्यमंत्र्यांना मात्र घर सुटत नसल्याची टिका केली जात आहे. या टीकेला उत्तर देण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. पाहणी केल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

असा असणार मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्त भागांचा दौरा
दिनांक 19 ऑक्टोबर 2020
सकाळी 8 वाजता – सांताक्रुझ विमानतळ येथून सोलापूरकडे प्रयाण
सकाळी 9 वाजता – सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण
सकाळी 9.15 वाजता – शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव
सकाळी 9.30 वाजता – सोलापूर येथून मोटारने अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खूर्दकडे प्रयाण
सकाळी 10.45 वाजता – सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तामुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा
सकाळी 11 वाजता – सांगवी पूलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी
सकाळी 11.15 वाजता – अक्कलकोट शहराकडे प्रयाण
सकाळी 11.30 वाजता – अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी
सकाळी 11.45 वाजता – अक्कलकोट येथून रामपूरकडे प्रयाण
दुपारी 12 वाजता – रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेती पीकांच्या नुकसानीची पाहणी
दुपारी 12.15 वाजता – रामपूर येथून बोरी उमरगे कडे प्रयाण
दुपारी 12.30 वाजता – रामपूर येथून अक्कलकोटकडे प्रयाण
दुपारी 12.45 वाजता – बोरी उमरगे येथून सोलापूरकडे प्रयाण
दुपारी 3.00 वाजता – पूरपरिस्थीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, नंतर सोलापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close