कृषीवार्ता

तांदळवाडी येथील बंधाऱ्याच्या बाजूची चार एकर जमीन वाहून गेली

            •  अँड. अजित देशमुख यांनी केली पहाणी

बीड — तांदळवाडी (हवेली) ता. बीड येथे सिंदफना नदीवर “अंणकुटा बंधारा” आहे. या बंधाऱ्याच्या दक्षिण बाजूने पाणी शिरले आहे. बंधाऱ्यातून पाणी न जाता ते शेतकऱ्यांच्या जमिनीतून गेले आहे. जवळपास चार एकर जमीन वाहून गेली आहे. येथील शेतकऱ्याची बंधाऱ्याच्या बाहेरील जमिनीतील विहीर पाण्यात आली असून प्रचंड नुकसान झाले आहे. आज जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी पाहणी केली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये सुरेश रंगनाथ परदेशी, नामदेव सटवाजी तुपे, चंपाबाई कुंडलिक काळे, जिजाबाई बळीराम बहिर, महादेव रंगनाथ तुपे यांचा समावेश आहे.

याचा पंचनामा चांगल्या अधिकाऱ्यांनी करणे जरुरीचे आहे.
बंधाऱ्याचे काम ” जिल्हा जल संधारण अधिकारी, मृद व जल संधारण विभाग, बीड” हे कार्यालय पाहते. त्यामुळे या खात्याला आदेश देऊन पाहणी आणि पंचनाम्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी अँड. देशमुख यांनी केल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यात लक्ष घातले आहे.

या बंधाऱ्याच्या पश्चिम बाजूने पाणी शिरले. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली आहे. जवळपास सर्व नदीपात्र बाजूला सरकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न व्हावा. तसेच पुन्हा जमिनीच्या बाजूने संरक्षक भिंत बांधण्यात यावी. अशी मागणीही शेतकऱ्यांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांपर्यत पोहोचवण्यात आली आहे.

या भागात अतिवृष्टीमुळे पिकांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी यामुळे हतबल झाला आहे. देशमुख यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close