महाराष्ट्र

औंरंगाबाद जिल्ह्यात ऊसतोडणी कामगारांचा लढा अधिक तीव्र करणार : चिंतामणी कदम पाटील

चौसाळा — शिव-शाहू ऊसतोडणी कामगार संघटनेच्या वतीने ऊसतोडणी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी गेली अनेक दिवसांपासून बेमुदत कोयता बंद आंदोलन सुरू असून औरंगाबाद जिल्ह्यात या आंदोलनामधे सक्रीय सहभाग नोंदविनारे चिंतामणी कदम पाटील यांच्या मुकुंदनगर येथील कार्यालयाला शिव-शाहू ऊसतोडणी कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांनी भेट दिली. यावेळी कदम यांच्या सामाजिक व ऊसतोडणी कामगारांच्या चळवळीची दखल घेऊन त्यांची शिव-शाहू ऊसतोडणी कामगार संघटनेच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड करून ऊसतोडणी कामगारांची चळवळ अधिक प्रभाविपणे राबवून सर्वसाान्यांपर्यत शासनाच्या विविध योजना पोहचविण्याचे काम करावे असे सांगितले.

या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना चिंतामणी कदम यांनी माझे आई वडील सुध्दा ऊसतोड कामगार असल्यामुळे ऊसतोड मजुरांची हलाखीची परिस्थिती मी जवळून अनुभवली असल्याचे सांगतानाच ऊसतोडणी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी भ्यविष्य काळातही हा लढा सुरूच ठेऊन संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात अधिक तीव्र करणार असल्याचे सांगतानाच या औरंगाबाद जिल्ह्यात मराठा, बंजारा व दलीत ऊसतोडणी कामगारांचा भरणा अधिक असून आगामी काळात त्यांची वज्र मुठ आवळणार असल्याचे सांगीतले.

याप्रसंगी शिव-शाहू ऊसतोडणी कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांच्यासह कल्याणराव गायकवाड, विनोदराव जोगदंड, चिंतामणी कदम पाटील, अक्षय नरवडे, उत्तमसिंग राठोड, सुभाषराव जोगदंड, मोतीराम पवार, जितेश सोनवणे, सुधीर जोगदंड, नंदलाल चव्हाण आदींची यावेळी उपस्थिती होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close