कृषीवार्ता

17 ते 21 ऑक्टोबर दरम्यान वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा इशारा

बीड — भारतीय हवामान खात्याने 17 ते 21 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात तसेच विशेषत्वाने मराठवाड्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या शक्यतेचा इशारा दिला आहे . विशेषतः दि 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी जास्त तीव्रतेने पाऊस येण्याचा इशारा प्राप्त झाला आहे . य पार्श्वभूमीवर बीड जिल्यातील शेतकऱ्यांनी सध्या शेतात काढणीस तयार असलेल्या पिकाची पावसाची उघडीप पाहून त्वरित काढणी करावी व काढणी केलेल्या पिकाची तात्काळ सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी . पावसाचे पाणी शेतात , उभ्या पिकात , भाजीपाला , फळबागेत साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी उताराच्या बाजूने चर काढावा . वाऱ्याच्या वेगात वाढ संभवण्याची शक्यता असल्याने नवीन लागवड केलेल्या फळबागेतील रोपांना काठीचा आधार देण्यात यावा .पिकामध्ये फवारणी , आंतरमशागतीची कामे आणि उभ्या पिकात खते देण्याची कामे पुढे ढकलावी .सदर कामे स्थानिक हवामान परिस्थिती व पावसाची उघडीप पाहुन करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी , बीड यांच्या वतीने करण्यात येत आहे .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close