महाराष्ट्र

बॉलिवूड व भाजपच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणार — गृहमंत्री

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी तपास यंत्रणांनी चौकशी करून देखील काहीच निष्पन्न झाले नाही. बॉलिवूड आणि भाजपच्या ड्रग्ज कनेक्शन ची चौकशी एनसीबी कडून होत नसल्याची तक्रार गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे काँग्रेस शिष्टमंडळाने केली आहे. एन सी बी ने तपास न केल्यास मुंबई पोलीस याप्रकरणी तपास करेल असे आश्वासन देशमुख यांनी दिले आहे.

https://twitter.com/AnilDeshmukhNCP/status/1317105173060177920?s=20
शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहात काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गृह मंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान बॉलिवूड आणि भाजप कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी 31 ऑगस्टला करण्यात आली होती तिचा पुनरुच्चार करण्यात आला. या मागणीला गृहमंत्री सकारात्मक असल्याचे सावंत यांनी सांगितले आहे. सावंत म्हणाले की, भाजप आणि बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन संदर्भातील सर्व पुरावे आणि माहितीवर एनसीबीने कार्यवाही केली नाही. चित्रपट निर्माता संदीप सिंह आणि विवेक ओबेरॉय याचे नाव येत होते. ड्रग्ज कनेक्शन संदर्भात बंगळुरु पोलिसांनी मुंबईत येऊन अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी छापे मारले, परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणांना वेळ मिळत नाही, याचे आश्चर्य वाटते.
कर्नाटकमध्ये भाजपच्या प्रचारात सामील झालेली अभिनेत्री रागिनी द्विवेदी ही चंदन ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटमध्ये पकडली गेली आहे. तिच्यासोबत 12 लोकांवर ड्रग्ज पेडलिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 12 लोकांमध्ये आदित्य अल्वा नावाचा व्यक्ती फरार असून तो विवेक ओबेरॉयचा मेव्हणा आहे. ही माहिती चौकशीकरिता दिली होती, मात्र एनसीबीने यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. तसेच संदीप सिंहने महाराष्ट्र भाजप कार्यालयात 53 वेळा कोणाला फोन केला याचे उत्तरही अद्याप मिळू शकले नसल्याचे सावंत म्हणाले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close