महाराष्ट्र

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची शरद पवार पाहणी करणार

मुंबई — मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण भागात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला त्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत.

शरद पवार दोन दिवसांच्या मराठवाड्याचा दौऱ्यावर असणार आहेत. तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद येथे शरद पवार भेट देणार असून पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी विरोधक वारंवार करत असून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मराठवाड्याचा दौरा करून नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close