महाराष्ट्र

अभिनेत्री कंगना राणावत विरोधात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई — मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश आज न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे कंगना हिच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
साहिल सय्यद याने आपण मुस्लिम असल्यामुळे आपल्याला काम न दिले जात असल्याचा आरोप करत वांद्रे न्यायालयामध्ये त्यांने धाव घेतली होती. तर मुंबईचा पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान असा उल्लेख करतही तिने ट्विट केले होते. याप्रकरणी देखील तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात वकिलांनी बुधवारी दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारी मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात आला होता.

वादग्रस्त विधानांमुळे कंगना चर्चेत
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडचे ड्रग कनेक्शन बाहेर आल्यानंतर कंगनाने बॉलिवूडमधील ड्रग्जचे सेवन आणि ड्रग्ज तस्करीबाबत अनेक वादग्रस्त विधाने केली. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी ड्रग्ज घेतात आणि बॉलिवूडची गटाराशी तुलना केली होती. खासदार जया बच्चन यांनी बॉलिवडूला बदनाम केल्याप्रकरणी संसदेत तिच्या विधानावर आक्षेप घेतला. जया यांनी काही चित्रपट व्यक्तिमत्त्वांवर संसदेत नाव न घेता काही टीका केली होती. हे लज्जास्पद आहे. ते खात असलेल्या थाळी मध्ये घाण करत आहेत. हे चुकीची आहे, असे म्हटले होते. त्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत हिने टीका केली होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close