देश विदेश

भारत हा दक्षिण आशियातील तिसरा सर्वांत गरीब देश ठरणार!

नवी दिल्ली — कोरोनामुळे तसेच यापूर्वी धोक्यात आलेल्या अर्थव्यवस्थेमुळे भारताच्या अधोगतीला सुरुवात झाली असून प्रति व्यक्ती जीडीपी दर चालू वर्षी भारतापेक्षा बांगलादेशचा अधिक असणार आहे.या अभूतपूर्व घसरणीमुळे भारत हा दक्षिण आशियातील तिसरा सर्वांत गरीब देश ठरणार आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) दिलेल्या माहितीनुसार चालू वर्षात म्हणजेच २०२० मध्ये बांगलादेशचा प्रतिव्यक्ती जीडीपी चार टक्क्यांनी वाढण्याची आशा आहे. म्हणजेच प्रतिव्यक्ती हे उत्पन्न १८८८ डाॅलर असेल. तुलनेत भारताचा तब्बल १०.५ टक्क्यांनी घसरून चार वर्षातील निच्चांकी म्हणजेच १८७७ डाॅलरवर पोहोचण्याची शक्यता आहे.
चालू किंमतीवर दोन्ही देशाची जीडीपी आकडेवारी समोर आली आहे. या अभूतपूर्व घसरणीमुळे भारत हा दक्षिण आशियातील तिसरा सर्वांत गरीब देश ठरणार आहे. आपल्यापुढे फक्त आता पाकिस्तान आणि नेपाळ सर्वांत कमी प्रतिव्यक्ती जीडीपी असणारे देश राहिले आहेत.
तर दुसरीकडे बांगलादेश, भुतान, श्रीलंका आणि मालदीव हे भारताच्या पुढे असणार आहेत. डब्ल्यूईओच्या डाटाबेसनुसार दक्षिण आशियात भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोनामुळे सर्वांत मोठा फटका बसणार आहे. श्रीलंका सुद्धा याच मार्गावर आहे. तुलनेत नेपाळ आणि भुतानच्या अर्थव्यवस्थेत वाढ होण्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे.
आयएमएफने पुढीलवर्षी भारतीय अर्थव्यवस्थेत पुढीलवर्षी सुधारणा होण्याचे सुतोवाच केले आहेत. असे असली तरी किंचित स्वरुपात भारत प्रतीव्यक्ती जीडीपीमध्ये बांगलादेशला किंचित मागे टाकण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षापूर्वी भारताचा हाच रेट बांगलादेशच्या तब्बल ४० टक्के अधिक होता.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close