महाराष्ट्र

राज्यपालां विरोधात शरद पवारांनी पंतप्रधानांकडे केली तक्रार

मुंबई — राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मंदिरे पुन्हा खुली करण्यासाठी लिहीलेल्या पत्राची आणि त्यात मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाचा विसर पडला आहे का? असा प्रश्न विचारला होता, त्याचीच दिवसभर चर्चा होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला प्रत्युत्तरही दिले . यावरुन भाजपकडून कडाडून विरोध केला आहे. आणि या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी ट्विट करुन राज्यापलांच्या या वादग्रस्त पत्राबद्दल पंतप्रधानांनाच पत्र लिहिल्याची माहिती दिली आहे.

माध्यमांद्वारे मला राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रा बाबत माहिती मिळाली. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडे धार्मिक स्थळे पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे. मी या पत्राबाबत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या पत्रातील घसरलेल्या भाषेकडे त्यांचे लक्ष वेधले आहे.
आपल्या घटनेच्या प्रस्तावनेतच सेक्युलर हा शब्द समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे सर्व धर्म समान असल्याची ग्वाही मिळते. मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला या घटनेच्या या तत्वानुसार वागणे आवश्यक आहे.’ असे म्हणत राज्यपालांच्या पत्रातील भाषेवर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचबरोबर त्यांनी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रातील भाषा ही एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने लिहिल्यासारखी असल्याची टीकाही केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close