आपला जिल्हा

आरक्षण स्थगिती निषेधार्थ अंबाजोगाईत शुक्रवारी मराठा क्रांती मोर्चा

अंबाजोगाई —  सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे.या स्थगितीच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने अंबाजोगाईत शुक्रवार,दिनांक दि.16 ऑक्टोबर रोजी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे.शहरातील दोन्ही आमदारांच्या निवासस्थानी हा मोर्चा धडकणार आहे.

मराठा आरक्षण स्थगितीचा निषेध करण्यासाठी अंबाजोगाई शहरात शनिवारी (दि.10) हॉटेल ‘ईट अँड स्टे’ या ठिकाणी सकल मराठा समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत सर्वांच्या सहमतीने अंबाजोगाई शहरात भव्य मोर्चा काढण्याचे आयोजन करण्यात यावे असे ठरले आहे.त्यानुसार शुक्रवार,दिनांक 16 ऑक्टोबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सकाळी ठीक 10 वाजता या मोर्चाला सुरूवात होणार आहे.याप्रसंगी निवेदन देण्यासाठी येतांना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा तसेच फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक राहील असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.हा क्रांती मोर्चा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निघाल्यानंतर विधानपरिषद आमदार संजयभाऊ दौंड यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना निवेदन देण्यात येईल.त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – मोंढा रोड – जुना पेट्रोल पंप – स्व.राजीव गांधी चौक – छत्रपती संभाजीराजे चौक या मार्गे केज विधानसभा आमदार नमिताताई मुंदडा यांच्या निवासस्थानी पोहोचेल.त्या ठिकाणी आ.मुंदडा यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चाची सांगता होणार आहे.

मराठा विद्यार्थीनी देणार निवेदन 

अंबाजोगाई शहरात राहणा-या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई अक्षय मुंदडा आणि विधान परिषदेचे आमदार संजयभाऊ दौंड यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे या बाबतचे निवेदन मराठा समाजातील विद्यार्थीनी देणार आहेत.तरी मराठा समाज बांधवांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर आणि फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करून या निवेदन देण्यासाठी काढण्यात येणा-या मोर्चात जास्तीत-जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अंबाजोगाई मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close