आपला जिल्हा

दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे कामे वकीलांमार्फतच करावेत.

वडवणी तालुका वकील संघाची तहसिलदारांकडे मागणी.

वडवणी — दस्त नोंदणीची कामे वकिलामार्फतच करण्यात यावीत अशी मागणी जिल्हाधिकारी बीड व तहसीलदार वडवणी यांच्याकडे वकील संघाच्या वतीने अध्यक्ष अँड. बी.बी. आंधळे, उपाध्यक्ष अँड. के. डी. काळे, सचिव अँड. तुकाराम आडे यांनी केली आहे.

वकील संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रजिस्ट्रेशन अॅक्ट प्रमाणे सर्व प्रकारचे दस्तऐवज दुय्यम निबंधक किंवा सहाय्यक निबंधक यांचे कार्यालयात नोंदवले जातात. त्या दस्ताशी निगडीत असलेल्या नियमांचे निष्कर्ष तपासुन पहावे करीता विधिज्ञांकडुन ड्राफ्ट तयार करुन त्याची नोंदणी दुय्यम निबंधक किंवा सहाय्यक निबंधक कार्यालयात विधिज्ञांमार्फत करुन दस्त संबंधी अभिप्राय देणे बंधनकारक करण्यात यावे, जेणे करून सर्व सामान्य लोकांचे हित सुरक्षित राहील व दस्तऐवज नोंदणी झाल्यानंतर त्या दस्तऐवजामध्ये कसल्याही प्रकारची कायदेशीर त्रुटी अथवा गुंतागुंत निर्माण होणार नाही व नविन वाद निर्माण होणार नाही.
वास्तविक दस्तलेखनाचा अधिकार स्टॅप वेंडर यांना नसतांना देखील स्टॅप वेंडर दस्त तयार करुन दुय्यम निबंधकाकडे सादर करतात व सदर लिहीलेल्या दस्तामध्ये कायदेशीर बाबी तपासून न पाहिल्यामुळे सर्व सामान्य लोकांना भविष्यामध्ये अडचणिस सामोरे जावे लागते. त्यामुळे दुय्यम निबंधक किंवा सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणीसाठी दस्त लिहिने, तयार करणे, नोंदणी करणे आदी सर्व कामे विधिज्ञामार्फतच करण्यात यावीत, त्याशिवाय नोंदणीचे दस्त दुय्यम निबंधक किंवा सहाय्यक निबंधक कार्यालयातने नोंदणीसाठी स्विकारू नयेत. तसेच स्टॅप वेंडर यांना दस्त लिखाणासाठी दस्त तयार करुन दुय्यम निबंधकाकडे सादर करण्यास मनाई करावी असे निवेदन जिल्हाधिकारी बीड व तहसीलदार वडवणी यांना दि.१३/१०/२०१० रोजी वडवणी वकील संघाच्या वतीने दिले यावेळी वकील संघाचे अध्यक्ष .अँड. बी.बी.आंधळे, उपाध्यक्ष .अँड. के.डी.काळे,सचिव अँड. टि.आर.आडे,अँड. व्ही.बी.लंगे,अँड. जी.एस.लंगे, अँड. एस.जे.चव्हाण, अँड. पि.के.तिडके, अँड. बी.के.तिडके, अँड. पी.व्ही.तिडके, अँड. एस.ए.शेख,अँड. एस.एच.काळे, अँड. पी.आर.शेळके, अँड. एस.ए.लंगे, अँड. यु.जी.गायकवाड, अँड. एन.आर.लंगडे, अँड. पी.एस.उजगरे, अँड. जे. एस. उजगरे, अँड. जी.ए.खताळ,अँड. डी.जे.चव्हाण, अँड. एम.डी.गदळे,अँड. व्ही.के.जाधव, अँड.पी.के.शिंदे, अँड. एस.पी.डोंबाळे,अँड. बी.डी.उजगरे, अँड. एस.एस.खिरे,अँड. एस.ए.कदम,अँड. एस.एस.आवचर,अँड. एस.बी.आंधळे इत्यादींनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close