देश विदेश

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या रिपब्लिक टिव्ही सारख्यांना पार्लेजी जाहिरात देणार नाही

मुंबई — समाजात तेढ निर्माण करत सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या टीव्ही चॅनल्सना यापुढे पार्ले कंपनी जाहिरात देणार नसल्याची घोषणा करतानाच इतर कंपन्यांनी देखील असेच अनुकरण करावे अशी अपेक्षा व्यक्त करत. रिपब्लिक टीव्ही व इतर चॅनल्सला जाहिरात न देण्याचे जाहीर केले आहे.
टी आर पी मध्ये फेरफार केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्ही सोबतच इतर चैनल वर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी नुकतेच दिले आहेत. त्यामुळे जाहिरातदार आणि विविध ऍड एजन्सी TV चॅनेल्सवर लक्ष ठेऊन असल्याचे दिसत आहेत . बजाज कंपनीने अशा चॅनल्सला यापुढे जाहिरात येणार नसल्याचे जाहीर केले होते. याच पावलावर पाऊल टाकत पार्ले जी ने देखील अशीच घोषणा केली आहे. यापुढे उग्र व समाजात तेढ निर्माण करणारे चॅनलला पार्लेजी यापुढे जाहिरात देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.या निर्णयामुळे TV चॅनेल्सला त्यांचा कंन्टेटमध्ये बदल करतील असे कंपनीचे आधिकारी बुध्द यांनी सांगितले आहे . गुन्हे शाखेच्या तपासानुसार , रिपब्लिक भारत बरोबरच फक्त मराठी आणि बॉक्स ऑफिस हे दोन चॅनेल्ससुद्धा फेक टीआरपी प्रकरणात अडचणित आले आहेत . फक्त मराठी आणि बॉक्स ऑफिस चॅनेलच्या मालकांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत मात्र रिपब्लिक चॅनेल्सच्या मॅनेजमेंटची चौकशी करून पुढील कारवाई करणार असल्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितले आहे . मुंबईतील 1800 घरामध्ये पैसे देऊन हे चॅनेल्स चालू ठेवावेत अस सांगण्यात आलं होतं त्यानुसार हा टीआरपी वाढवण्यात हातभार लावण्यात आला . महिन्याला 400 ते 500 रुपये या लोकांना देऊन टीआरपी वाढवण्यात येत होता .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close