ब्रेकिंग

कोविड हॉस्पिटलला आग, जीव धोक्यात घालून वाचवले 39 रुग्णांचे प्राण

मुंबई — सध्या कोरोनाशी लढाई सुरू असताना मुलुंडमधील अपेक्स covid-19 रुग्णालयास आग लागली.या रुग्णालयातील ICU ला ही आग लागल्याने प्रचंड गोंधळ उडाला. मात्र सुदैवाने सर्व 39रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळालं. रुग्णालय कर्मचारी आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी जीव धोक्यात घालून सर्व रुग्णांना सुरक्षीत बाहेर काढलं. त्यांच्यावर दुसऱ्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.

अपेक्स हॉस्पिटल मध्ये धूर निघत असल्याचे निदर्शनास येताच रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आले. यामध्ये थोडी जरी दिरंगाई झाली असती तरी मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. दरम्यान ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचे फायर ब्रिगेडच्या कर्मचार्‍यांनी सांगितले
रुग्णवाहिका आणि बसेस मधून या रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहितीही देण्यात आली. जनरेटरमध्ये शॉर्ट सक्रिट झालं आणि आग लागली असावी असा अंदाज फायर ब्रिगडच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close