देश विदेश

सेना राष्ट्रवादी बिहार निवडणूक एकत्र लढणार ?

मुंबई – महाराष्ट्राचं राजकारणाला बळकटी देणारी एक मोठी घटना लवकरच घडू शकते. महाराष्ट्राचे दोन पक्ष बिहारची विधानसभा निवडणूक एकत्रित लढवणार असल्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट झाली असून त्यामध्ये बिहार निवडणूक एकत्र लढवण्या संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकाच राज्यातील 2 प्रादेशिक पक्ष एकत्रितपणे दुसऱ्या राज्यात निवडणूक लढवणार असल्याचं दुर्मिळ राजकारण या निमित्तानं प्रत्यक्षात येऊ शकतं. ठाकरे-पवार भेटीत बिहार निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचंही समजत आहे. शिवसेनेनं बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे केले आहेत. थेट भाजप आणि एनडीएला शह देण्याचा सेनेचा प्रयत्न करत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र निवडणूक लढवली गेली तर त्यातून नव्या राजकीय समीकरणांचा उदय होऊ शकतो .

शिवसेना खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांची नुकतीच बैठक झाली होती. त्यात निवडणुकीतील राजकारणावर चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यातील सध्याच्या घडामोडी आणि प्रशासकीय विषयांवरही मुख्यमंत्री आणि पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close