आपला जिल्हा

गरज असेल तर टेस्ट करा, नाहीतर तसेच मरा प्रशासनाची भूमिका; कोरोना चाचण्यांची संख्या तीन पटीने घटली

बीड — गरज वाटत असेल तर टेस्ट करा नाहीतर तसेच मरा ही भूमिका प्रशासनाने घेतली असल्यामुळे कोरोना चाचण्यांची संख्या तीन पटीने कमी झाल्यामुळे रुग्ण संख्या देखील अर्ध्यावर आली आहे. प्रशासनाची ही भूमिका मात्र कोरोना च्या दुसऱ्या लाटेकडे लोटणारे असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. 578 जणांच्या तपासणी अहवालात फक्त 78 रुग्ण नव्याने आढळले आहेत तर पाचशे जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
त्रास होत असेल तरच रुग्णांची चाचणी केली जात आहे क्वचीत एखादा रुग्ण संशयावरून तपासणीसाठी गेला असता त्यास गोळ्या औषधांचा डोस देऊन घरी पाठवून सतर्कता बाळगावी त्रास झाल्याचा आमच्याकडे यावे असे शासकीय रुग्णालयातून सांगितले जात असल्यामुळे चाचण्यांची संख्या कमालीची घटली आहे. पॉझिटिव रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत असले तरी सुपर स्प्रेडरची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
अंबाजोगाई — 14
शेपवाडी मध्ये 5, दैठणा, गिरवली प्रबुद्ध नगर मुढेगाव नंदलाल नगर यशवंतराव चव्हाण चौक, उजनी, रुक्माई नगर मेडिकल परिसर अनुराग कॉलनी
आष्टी — 10
सुर्डी दोन महादेव मंदिर शेजारी कडा 2 मांडवा, मराठ गल्ली, कारखेल खुर्द मदन महाराज मंदिर कडा हिमायतनगर आष्टी नांदा
बीड — 21
नवी भाजी मंडई 2 स्वराज्य नगर दोन, संत तुकाराम नगर 2 शाहूनगर दोन, ओम अपार्टमेंट तिरुपती नगर, पिंगळे नगर, कृषी नगर, सारडा नगरी संत नामदेव नगर, फुलाई नगर, चक्रधर नगर 2, विद्यानगर पश्चिम बीड शहर पोलीस ठाण्याचा एक कर्मचारी पॉझिटिव्ह झाला आहे ‌
धारूर — 5
पहाडी पारगाव मध्ये तीन पाटील गल्ली धारूर आसोला धारूर
गेवराई — 4
भेंडटाकळी भाटेपुरी सेवालाल नगर कोल्हेर
केज — 3
कानडी माळी मध्ये दोन, तसेच तांबवा येथे एक रुग्ण सापडला.
माजलगाव — 1
चांदणी ग्राउंड परिसरात 70 वर्षीय इसमास बाधा झाली आहे.
परळी — 6
सर्वेश्वर नगर नागदरा, विद्यानगर अस्वलांबा, तळेगाव गाढे पिंपळगाव
पाटोदा — 3
पारगाव घुमरा मध्ये दोन सुतार गल्ली पाठवता मध्ये एक रुग्ण सापडला
शिरूर — 5
सरकारी दवाखाना जवळ दोन रुग्ण रायमोहा घाटशील पारगाव टेंभुर्णी
वडवणी — 6
चिखल बीड ऐश्वर्या हॉटेल वडवणी खडकी वानवल गल्ली मामला, कोठारबन.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close