महाराष्ट्र

लॉकडाऊन मध्ये कार्पोरेट जावयाचे सासरवाडीतून वर्क फ्रॉम होम ; आता धोंडा खाऊन निघाले दिवाळी करण्यासाठी घरी

बीड — कोरोनामुळे हवेत राहणाऱ्या भल्याभल्यांना जमिनीवर आणले आहे.या काळात मोठ्या शहरात राहणाऱ्या नोकरदार वर्गाला आपल्या कामाच्या पध्दतीत बदल करून वर्क फ्रॉम होम मुळे घरी राहून काम करण्याची संधी मिळाली.मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या नोकरदारांनी आपल्या परिवारासह थेट आपल्या गावी जाऊन राहणेच पसंद केले,तर काही जणांनी आपल्या सासरवाडीत मुक्काम ठोकलाअसल्याचे चित्र पाहायला भेटले. मोठ्या शहरातील जावई असला की गावाकडचा देखील संबंध तोडला जातो. गावाकडे जायला जागा नाही असे जावई मात्र या पाच सहा महिन्याच्या काळात सासऱ्याच्या पायावर पडलेला धोंडा म्हणावयाची वेळ अनेकांना आली आहे.आता काही महिने उलटत असतांना जावई धोंडे खाऊनच आपल्या नोकरीच्या शहरा घरी जाताना दिसून येत आहेत

शहरातच राहणारा जावई-मुलगा पाहिजे असा मुलींचा हट्ट असतो गलेलठ्ठ पगारी आणि शहरातील वातावरण यामागचे मुख्य कारण असते.मात्र कोरोनामुळे आता या सर्वांना आपल्या गावाकडील घरीच रहावे लागत आहे.
एरव्ही न भेटणाऱ्या सुट्ट्या आणि व्यस्त दिनक्रम यामुळे माहेरी न जाता आलेल्या विवाहितांना माहेरी जाण्याचे कारणच भेटले आहे.तर अनेकांनी गावाशी नाळ तोडून टाकली आप्तस्वकीय दुरावले गेले
यामुळे कांहीं जावायांनी आपले बस्तान सासरवाडीत मांडून वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे. मात्र कोरोना चा प्रादुर्भाव कमी होण्याचे कुठले चिन्ह सध्या तरी दिसत नाही. चार-पाच महिने जावई लेक संभाळण्याची वेळ आल्यामुळे सासरेबुवांचे एकूण बजेटच बिघडुन गेले. यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणून धोंड्याचा महिना देखील आला.
एकीकडे सासरवाडीचे बजेट कोलमडले असतांना दुसरीकडे धोंड्याचा महिना आल्याने खर्चात भर पडली आहे.तस तर काही जावई सासरवाडीत राहणं पसंद करत नाहीतच मात्र कोरोनामुळे निर्माण झालेली वर्क फ्रॉम होम पद्धत आणि पत्नीला माहेरी राहण्याची संधी यामुळे गेले काही महिने मुक्कामी असलेले जावाई आता दिवाळी मात्र आपल्या घरीच करण्याच्या तयारीला लागलेले दिसून येत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close