आपला जिल्हा

मृतदेहाची अदलाबदल, अंबाजोगाई रुग्णालयाचा प्रताप

बीड — अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला. बीड येथील एका तरुणाचा निमोनियामुळे मृत्यू झाला.त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आलेली होती. असं असताना रुग्णालय प्रशासनाने किटमध्ये गुंडाळून मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली केला . बीडला गेल्यानंतर किट काढा आणि अंत्यविधी करा असे त्यांना सांगण्यात आले . रुग्णवाहिकेतुन मृतदेह बीडमध्ये आणल्यानंतर कुटुंबियांनी पाहिला असता तो मृतदेह आपला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. मृतदेहाची अदलाबदल झाल्याने तो मृतदेह तसाच रुग्णवाहिकेतून शनिवारी रात्री उशिरा अंबाजोगाईला नेण्यात आला.

बीड शहरातील मोमीनपुरा भागातील 32 वर्षीय तरुणावर निमोनिया झाल्याच्या कारणावरून अंबाजोगाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला अँटिजेन टेस्टमध्ये ते निगेटिव्ह आले. त्यांनतर त्यांचा स्वॅब घेण्यात आला, तो अहवालही निगेटिव्ह आला. मात्र निमोनियामुळे शनिवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. रात्री 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास रुग्णालय प्रशासनाने किटमध्ये गुंडाळून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला व बीडला गेल्यानंतर किट काढून अंत्यविधी करा असे कुटुंबियांना सांगण्यात आले. मात्र शव बीडला आणल्यानंतर मृतदेह आपला नसल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. त्यामुळे तो मृतदेह पुन्हा रुग्णवाहिकेतून अंबाजोगाईला पाठवण्यात आला. याबाबतची माहिती कळविल्यानंतर तरुणाचा मृतदेह अंबाजोगाई रुग्णालयात असल्याचे प्रशासनाने सांगितल्याने रात्री उशिरा कुटुंबिय मृतदेह आणण्यासाठी अंबाजोगाईला गेले. दरम्यान या प्रकारामुळे कुटुंब, नातेवाईक आणि नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. अंबाजोगाई रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे मृतदेहाची अदलाबदल झाली. मात्र भलत्याच इसमाचे शव गुंडाळलेले उघडण्यात आल्यामुळे लोकांमध्ये कोरोणाची भीती निर्माण झाली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close