देश विदेश

धोनीच्या मुलीवर बलात्काराची धमकी देणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अहमदाबाद — चेन्नई सुपर किंग्स चा कर्णधार एम एस धोनीच्या मुलीवर सोशल मीडियातून बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस गुजरात मधील कच्छ जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. कोलकत्ता विरोधातील सामन्यात चेन्नईच्या झालेल्या पराभवामुळे आरोपीच मानसिक संतुलन बिघडलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


गुजरात पोलिसांनी सायबर क्राईम नुसार आरोपीला कच्छ जिल्ह्यातून अटक केली असून लवकर त्याला राज्य पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आरोपी अल्पवयीन असून सध्या तो बारावीमध्ये शिकत आहे. त्यास कच्छ जिल्ह्यातील नाना कपाया येथून अटक करण्यात आली. गुरुवारी आयपीएल सामन्यात चेन्नई कोलकत्ता यांच्यात लढत झाली होती. या सामन्यात चेन्नईच्या अवघ्या दहा धावांनी पराभव झाला होता. या पराभवानंतर आरोपीने रागाच्या भरात सोशल मीडियावर धोनीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली.
धोनीची मुलगी ५ वर्षांची असून ती सध्या भारतातच आहे. तर धोनी युएईमध्ये आपल्या संघाचं नेतृत्व करतो आहे. IPL 2020 मध्ये अद्याप धोनीला आपली चमक दाखवता आलेली नाही. एका सामन्यात धोनीने ४७ धावा केल्या पण त्या सामन्यात त्याला मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करता आली नाही. त्यामुळे धोनीवर सातत्याने टीका केली जात आहे. परंतु याच बाबतीत काहींनी विकृतीचा कळस गाठत धोनीची चिमुरडीवर बलात्काराची धमकी दिली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close