क्राईम

5 हजारांची लाच घेताना रेशीम कार्यालयाचा क्षेत्र सहाय्यक रंगेहात पकडला

बीड — किटक संगोपन गृहाचे अनुदान मिळण्यासाठी 15 हजार रुपयांची लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 13 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यापैकी पाच हजार रुपये लाच स्विकारतांना जिल्हा रेशीम कार्यालयाचा क्षेत्र सहाय्यकास केज बस स्थानकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले
जिल्हा रेशीम कार्यालयाचे क्षेत्र सहाय्यक सुबराव गुलाबराव मस्के वय 55 वर्ष याने तक्रारदारास तुतीच्या पिकाची लागवड करण्यासाठी तसेच या पिकाची नोंद ही जिल्हा रेशीम कार्यालय बीड येथे करून घेण्यासाठी याबरोबरच किटक संगोपन गृहाचे अनुदान मिळण्यासाठी 15 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. यामध्ये तडजोड करून शेवटी 13 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यापैकी पाच हजार रुपये लाच स्विकारतांना रविवारी केज बस स्थानकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, बीड उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रविंद्र परदेशी, पोनि.राजकुमार पाडवी, पोना.श्रीराम गिराम, पोना.हनुमान गोरे, पोशि मनोज गदळे, चालक पोशि संतोष मोरे यांनी केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close