महाराष्ट्र

न्यूज वेब पोर्टल चा राजकारण्यांकडून होणारा कंडोम सारखा वापर कुठपर्यंत ?

बीड — कोरोना संकटकाळात माहितीचे आदान-प्रदान वेब पोर्टलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झाले गेले. या डिजिटल मीडियाने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका खंबीरपणे याकाळात निभावली. असं असलं तरी प्रचंड प्रभावी माध्यम म्हणून राजकारण्यांच्या माध्यम तज्ञांना ज्ञान असल्यामुळे ते वेब पोर्टल चा वापर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाणात करत आहेत. परंतु कार्यक्रमाच्या जाहिराती देण्याच्या वेळी या माध्यमांकडे पाठ फिरवली जात असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. डीएम असो की पीएम, दादा असो की पादा, अण्णा असो की गन्ना ही राजकारणी मंडळी मात्र या माध्यमांचा कंडोम सारखा वापर करून स्वहित जपण्याच काम करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात वेबपोर्टल चालवणाऱ्या आजच्या संपादकांनी आशा राजकारण्यांना लाथाडण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
कोरोना संकटकाळात ज्यावेळी सर्व जग ठप्प झाले होते अशा अवस्थेत वेबपोर्टल ने मोठ्या प्रमाणात प्रशासकीय व्यवस्थेवर, राजकीय भूमिकांवर अंकुश ठेवण्याचं प्रभावी काम केलं. इलेक्ट्रॉनिक माध्यमापेक्षा छोट्या छोट्या इतंभूत बातम्या घरात बसलेल्या व्यक्तींपर्यंत जबाबदारीने पोहोचवल्या. वर्तमानपत्र वाहतूक व्यवस्था ठप्प असल्यामुळे वाचकांपर्यंत पोहोचू शकले नाहीत अशा अवस्थेत डोंगर कपाऱ्यात बसलेल्या लोकांपर्यंत माहिती पोचवण्याचं काम या माध्यमाने केलं. स्थानिक राजकारणामध्ये वेब पोर्टलच्या माध्यमाचा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वापर केला जात आहे. प्रत्येक राजकारण्यांजवळ माध्यमातल्या जाणकारांची मोठी फौज आहे. ती फौज तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत आपला संदेश या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करीत आहेत. दैनिकांच्या कितीतरी पट हे माध्यम प्रभावी विश्वासार्ह असले तरी सध्या फक्त याचा वापर केला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे चे आमचे कार्यकर्ते हे न्यूज पोर्टल ला पाहतात त्याचा फायदा वाचक संख्या वाढवून लाखो रुपये गुगल जाहिरातीच्या माध्यमातून वेब पोर्टल देत असल्याचा गोड गैरसमज या राजकारण्यांनी करून घेतला आहे. त्यामुळेच आपल्या बातम्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देण्याचे काम करत असल्याचा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत आहे. नेत्याने एखादे काम केले की काही क्षणात बातमी कानाकोपऱ्यात पोहोचवली जावी अशी भूमिका मात्र नेत्यांच्या जवळच्या माणसाकडून घेतल्या जाते. हे वास्तव चित्र सध्याच असलं तरी फुकट्या प्रसिद्धी तंत्राचा वापर करून सुद्धा जाहिराती देताना मात्र तोंड वाकडी केल्या जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात वेब पोर्टल चालवणाऱ्या संपादकांनी अशा फुकट्या राजकारण्यांना कितपत स्थान द्यायचं याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. लवकरच संपादक या अनुषंगाने आपल्या न्यूज पोर्टल ची ध्येय धोरण बदलून वाचकांपर्यंत सत्य विश्वसनीय माहिती पुरवण्याच व आशा फुकट्या नेत्यांचं महिमा मंडन करून विश्वासार्हता गमावण्याचा काम करणार नाहीत. अशी अपेक्षा आता जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close