महाराष्ट्र

सोलापूर– बीड – जळगाव रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण

बीड — मराठवाड्याला जोडणाऱ्या महत्वपूर्ण अशा सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद – बीड – जळगाव रेल्वे मार्ग लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून सध्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे .भूसंपादन करण्याचे काम सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. याबाबत सोलापूरचे खा.जयदिधेशीर महास्वामी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मध्य रेल्वे विभागात असलेल्या सोलापूर विभागातील खासदारांची रेल्वेचे महा व्यवस्थापक यांच्या सोबत ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीस मध्य रेल्वे चे महा व्यवस्थापक संजीव मित्तल, खा.महास्वामी, खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, विभागीय रेल्वे व्यवसथापक शिलेश गुप्ता, नगर, प्रदीप हिरदे आदी उपस्थित होते. रेल्वे मंत्रालयाने मार्च 2019 मध्ये मंजुरी दिली होती. त्यानंतर रेल्वे रेल्वे प्रशासनाकडून संरक्षणाचे काम हाती घेतले होते सोलापूर पासून शेवटच्या स्थानकापर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे नकाशे रेखांकन आचे काम प्रगतिपथावर आहे. भूसंपादनासाठी सर्व कारवाई केली जात आहे. भूसंपादन फुल व इतर कामांसाठी इंजीनियरिंग कन्सल्टंट ची नेमणूक करण्याचे काम सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगितले आहे. रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्यासोबत खासदारांच्या झालेल्या ऑनलाईन बैठकीत सर्व खासदारांनी नव्या गाड्या सुरू करण्यासोबत आहे त्या गाड्या जास्तीत जास्त रेल्वे स्थानकावर थांबा यासंदर्भात चर्चा केली. रेल्वे मंत्रालयाशी समन्वय साधून जास्तीत जास्त मागण्या अडचणी कामे पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असेही मत खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close