आपला जिल्हा

बॅक वॉटर योजनेच्या भागातील शेतकर्‍यांची नगराध्यक्षांनी घेतली भेट

  • पाईपलाईन नंतर लगेच रस्त्याचे कामही करू – डॉ.भारतभूषण क्षीरसागर

बीड — बीड शहराला पाणी पुरवठा करणार्‍या माजलगाव बॅक वॉटर योजनेच्या कामाला गती मिळाली असून काडीवडगाव येथील प्लांटपासून मुख्य रस्त्यापर्यंत असलेले काम लवकरच सुरू होणार असून तत्पुर्वी या भागातील शेतकर्‍यांच्या अडचणी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी आज शेतकर्‍यांशी संवाद साधला. आधी पाईपलाईनचे काम करून नंतर रस्ता रूंदीकरण व रस्त्याचे काम करून घेऊ असे ते म्हणाले. कुठल्याही शेतकर्‍याला अडचण येणार नाही याची काळजी घेऊनच काम करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
माजलगाव बॅक वॉटर योजना 2004 साली सुरू झाली तेंव्हा लोकसंख्या 2030 ची गृहीत धरून केली होती त्यासोबत बिंदुसरा धरण व बुस्टर पंप गृहीत धरून ही योजना कार्यान्वित झाली आता मात्र लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. शहरी भागात ग्रामीण लोकांचे स्थलांतर झाले आहेत. लोक रहिवाशी ग्रामीण भागाचे असले तरी शहरात रहात आहेत ही संख्या जवळपास 60 ते 70 हजाराने वाढली आहे हे लक्षात घेऊन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून आणि नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे अमृत अटल योजना मंजूर करून आणली. ही योजना पुढील 2050 ची लोकसंख्या गृहीत धरून सुरू होत आहे. सध्या माजलगाव आणि बिंदुसरा धरणात मुबलक पाणीसाठा आहे. सध्या 24 तास माजलगाव बॅक वॉटरची कार्यप्रणाली चालू असून यातून बीड शहराच्या काही भागात 6 दिवसाला पाणी पुरवठा होत आहे. बीड शहरात एकूण 11 जलकुंभ कार्यान्वित असून 5 जलकुंभाचे काम अंतिम टप्प्यात आहे हे काम झाल्यास बीड शहरातील नागरीकांना एक दिवसा आड पाणी पुरवठा करता येणार आहे. ही योजना तात्काळ कार्यान्वित व्हावी यासाठी राहिलेले काम आता सुरू होत आहे यासाठी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी माजलगाव बॅक वॉटर योजनेच्या ठिकाणी जावून पाईपलाईन भागातील शेतकर्‍यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. शेतकर्‍यांच्या अडचणी लक्षात घेऊन उपस्थित असणार्‍या अधिकार्‍यांना याबाबत सुचनाही दिल्या. या रस्त्याचे काम अर्धवट राहिलेले आहे हे काम पूर्ण व्हावे यासाठी सर्वांचाच प्रयत्न आहे त्यामुळे या भागातील पाईपलाईन करत असतानाच रस्त्याचे कामही पूर्ण करावे अशी मागणी शेतकर्‍यांनी केली, ती मान्य करत आधी पाईपलाईनचे काम करून घेऊन लगेच रस्त्याचे कामही करून घेऊ असे डॉ.क्षीरसागर यांनी शेतकर्‍यांशी बोलताना सांगितले. यावेळी सभापती रविंद्र कदम, मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे, फिल्टर ऑपरेटर पी.आर.दुधाळ, मनसेचे जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, सरपंच बाळासाहेब राऊत, मोहनराव बादाडे, नागोराव बादाडे, महावीर मस्के, नानाभाऊ बादाडे, अनिल बादाडे, अक्रून बादाडे, रामेश्‍वर बादाडे, उध्दव बादाडे, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता मडावे, अमृत योजनेचे अभियंता चौधरी, उपअभियंता गिरी, कनिष्ठ अभियंता किरण यांच्यासह परिसरातील शेतकरी, नागरीकांची उपस्थिती होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close