क्राईम

ट्रॅव्हल्स मधील‍ व्यापाऱ्याचे 8 लाख पळवले, मांजरसुंबा रोडवर घडली घटना

बीड- मांजरसुंबा येथील रोडवर एका हॉटेल समोर नाश्त्यासाठी ट्रॅव्हल्स थांबली असता लातूर येथील व्यापारी आपली पैशाची बॅग गाडीत ठेवून लघूशंकेसाठी गेले गेले या वेळेत मास्क बांधलेल्या दोन चोरट्यांनी गाडीतील 8 लाख रुपये चोरून नेल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली असून याबाबत शुक्रवारी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, बीड तालुक्यातील मांजरसुंबा रोडवर असलेल्या कन्हैय्या हॉटेलसमोर ही घटना घडली. ट्रॅव्हल्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने या कॅमेर्‍यात दोन चोरटे कैद झाले. चोरटे लातूरहून एका कारने ट्रॅव्हल्सचा पाठलाग करत असल्याचे समोर आले. या प्रकरणी शुक्रवारी तिघा जणांविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
साहेब ए. वकील पठाण (वय 30, रा. बुद्धनगर, आंबेडकर चौक लातूर) हे व्यापारी गुरूवारी विश्व नावाची ट्रॅव्हल्स (क्र. एम.एच. 24 ए.ए.यू 3939) यामध्ये सुरतकडे जात होते. पठाण हे लातूर येथील कपड्याचे मोठे व्यापारी आहेत. ते सुरतला कपडे आणण्यासाठी जात असताना त्यांच्याजवळ नगदी 8 लाख रुपये होते. ट्रॅव्हल्स गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान मांजरसुंबा रोडवर असलेल्या कन्हैय्या हॉॅटेलसमोर नाश्त्यासाठी थांबली होती. यातील बहुतांश प्रवाशी नाश्त्यासाठी गेले होते. तितक्या वेळेत पठाण हे आपल्या पैशाची बॅग ठेवून लघूशंकेला गेले. या वेळेत दोन चोरट्यांनी त्यांची 8 लाख रुपयांची बॅग पळविली. परत आल्यानंतर आपले पैसे चोरीला गेल्याचे पठाण यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नेकनूर पोलिसांशी संपर्क साधला. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक किशोर काळे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी ट्रॅव्हल्समधील सीसीटीव्ही कॅमेरा तपासला असता त्यात दोन चोरटे पैशे चोरी करत असल्याचे दिसून आले. या चोरट्यांच्या चेहर्‍यावर मास्क असल्याने त्यांचा चेहरा कॅमेर्‍यामध्ये स्पष्ट दिसत नव्हता. विशेष म्हणजे या ट्रॅव्हल्सचा पाठलाग चोरटे लातूर येथून करत असल्याचे समोर आले. या प्रकरणी पठाण यांच्या फिर्यादीवरून तीन जणांविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close