क्राईम

चंदन तस्कर माजी नगरसेवकासह चौघां विरोधात गुन्हा दाखल

अंबाजोगाई — नुकतेच सुरु झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाये यांनी चंदन चोरांना दणका देत चौघा जणांना विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अहमदपूर रोडवर पिंपळा धायगुडा शिवारात सापळा रचून काळ्याबाजारात चोरट्या मार्गाने जाणारे 64 हजार रुपया चे चंदन सहित पाच लाख 64 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ‌. याप्रकरणी एका चंदन चोरास अटक केली असूनमाजी नगरसेवकासह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवारी दुपारी अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर चोरीचे चंदन घेऊन एक पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी अंबाजोगाईच्या दिशेने निघाल्याची गुप्त माहिती उपविभागीय अधिकारी सनिल जायभाये यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा होताच जायभाये यांच्या आदेशाने त्यांच्या विशेष पथकाने पिंपळा धायगुडा येथे सापळा लावला. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास टीप मिळालेली बोलेरो गाडी (एमएच ३१ डीव्ही ८३३१) अंबाजोगाईकडे येताना दिसताच पोलिसांनी तिला अडविले. गाडीची झडती घेतली असता पाठीमागील सीटवर पांढऱ्या पोत्यात ठेवलेले ६४ हजार रुपये किमतीचे ३२ किलो सुगंधित चंदन पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी चंदन आणि बोलेरो असा एकूण ५ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त करून चालक तुषार प्रभाकर आंबाड रा. इरिगेशन ऑफिसच्या पाठीमागे, केज याला पकडले याप्रकरणी केजचा माजी नगरसेवक बालाजी जाधव याच्या सांगण्यावरून आपण हे चंदन घाटनांदूर येथील अनोळखी व्यक्तीकडून घेतले आहे. ते बालाजी जाधव याच्या स्वाधीन करण्यासाठी केजला वापस जात होतो असे आंबाड याने पोलीस चौकशीत सांगितले. पो.ह. लक्ष्मण टोले यांच्या फिर्यादीवरून तुषार आंबाड, बालाजी जाधव बोलेरो मालक समीर हनुमंत साळुंके या चौघांवर कलम ३७९, महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम कलम ४१,४२ आणि भारतीय वृक्षतोड अधिनियम कलम २६(फ) अन्वये अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close