आपला जिल्हा

बीड शहरातील रस्त्याची कामे सुरू करण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

 बीड —बीड शहरातील मंजूर असलेल्या प्रमुख चार रस्त्यांची कामे सुरू झाली होती मात्र स्थानिक आमदाराने ही कामे जाणीव पूर्वक अडवून जनतेची दिशाभूल केली पिंपरगव्हान रोड,हिरालाल चौक, स्वराज्य नगर,व अन्य मुख्य रस्त्याची कामे सुरू करण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीच आता पुढाकार घेतला असून येत्या चार दिवसात ही कामे सुरू होतील असे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले

आज गुरुवारी सांयकाळी नगराध्यक्ष डॉ भारतभुषण क्षीरसागर, सभापती रविंद्र कदम,नगरसेवक सतीश पवार,ऍड विकास जोगदंड,मुखींद लाला,गणेश वाघमारे, भास्कर जाधव,सुभाष सपकाळ,राणा चव्हाण,आदींनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन शहरातील विविध कामांबाबत चर्चा केली, बीड शहरातील नगरपरिषदे अंतर्गत पिंपरगव्हाण रस्ता हिरालाल चौक येथील रस्ता स्वराज्य नगर येथील रस्त्याच्या कामासह शहरातील इतर ठिकाणीही कामे सुरू करण्यात आली होती मात्र बीड चे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत येऊन सदर रस्त्याचे काम अडविले व ते बंद पाडले याबाबत स्थानिक वर्तमानपत्रातून ही कामे बोगस चालू असल्याचे खोटे आरोप करत जनतेची दिशाभूल करण्यात आली सुरू असलेल्या कामात जाणीवपूर्वक अडथळा आणून शहरातील कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न स्थानिक आमदाराकडून केला जात आहे जी कामे अजून सुरूच झाली नाही ती कामे बोगस असल्याचा जावईशोध स्थानिक आमदाराने कसा काय लावला असा सवाल करत बीड नगर परिषद अंतर्गत होणाऱ्या मंजूर रस्त्याचे काम आणि येत्या चार दिवसात सुरू करणार असून सदरील कामावर पोलीस संरक्षण देऊन विकासकामांना अडथळा आणणार यावर तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावेत अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संपूर्ण माहिती घेऊन मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना तात्काळ संपर्क साधून ही कामे सुरू करा अडथळा आणणार यावर तात्काळ गुन्हे दाखल करा कामे सुरू केल्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी हजर राहणार आहे व कामे करून घेणार आहे आश्वासित केले त्यामुळे शहरातील ही कामे सुरू करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे येत्या चार दिवसात आता ही कामे सुरू करत असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close