आपला जिल्हा

माती वाहतूक करणाऱ्या टिप्पर ने १४ वर्षीय मुलास चिरडले

सिरसाळा — पोहनेर रस्त्याने‌ सिरसाळ्या कडे जात असलेल्या टिप्परने लहान मुलांस जोराची धडक दिली या दुर्घटनेत 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

आज बुधवारी ट्यूशन संपल्यानंतर पन्हाळ तांडा या आपल्या गावी परतत असताना ईश्वर दत्‍ता राठोड या 14 वर्षीय बालकाचा वीट भट्टी वर माती वाहतूक करणाऱ्या टिप्पर क्र.एम. एच.१२एफ.सी ८१६४ ने
धडक दिली यामध्ये मुलाचा मृत्यू झालाया अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी जाऊन टिप्पर वर दगडफेक सूरू केली . घटनास्थळी पोलिसांनी भेट दिल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. दरम्यान घटनास्थळी जमा झालेल्या नातेवाईकांनी केलेल्या दगडफेकीत टिप्परच्या काचा फोडल्या. पोलिसांनी पंचनामा करून रात्री साडेआठच्या सुमारास शव उत्तरीय तपासणीसाठी शिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आली

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close