क्राईम

तीस वर्षीय महिलेवर पळवून नेऊन आठ दिवस अत्याचार

उमरगा — वीटभट्टीवर काम करत असलेल्या तीस वर्षीय महिलेस पळवून नेऊन तिच्यावर आठ दिवस अत्याचार केल्याप्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा चौघा जणांविरोधात बलात्कार व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकातील झळकी ता. बसवकल्याण येथील पारधी कुटुंब लातूर मार्गावर असलेल्या लक्ष्मी पाटी परिसरातील वीटभट्टीवर काम करत आहे. 19 सप्टेंबर रोजी सलीम शाने दीवान हा या महिलेच्या घरी आला. यावेळी बोलण्याच्या निमित्ताने घराबाहेर आलेल्या या तीस वर्षीय पीडित महिलेला सलीम ने लातूर मार्गे गाडीत टाकून पळवून नेले. आठ दिवस तिच्यावर अत्याचार केल्यानंतर 26 सप्टेंबरला सलीम ने या महिलेस आदम, पतराज व शाहरुख यांच्या ताब्यात दिले. या तिघांनी तिला कळंब पोलीस ठाण्याजवळ आणून सोडले. या प्रकरणाची कैफियत सदर महिलेने पोलिस ठाण्यात मांडली मात्र पोलिसांनी महिलेची मानसिक स्थिती चांगली नसल्यामुळे तिच्या आई-वडिलांना बोलावून घेऊन तिला गावाकडे पाठवले. याप्रकरणी सोमवारी उमरगा पोलिस ठाण्यात येऊन पीडित महिलेने संपूर्ण हकीगत सांगितली. याप्रकरणी सलीम शाने दिवान, आदम, पतराज व शाहरुख यांच्याविरोधात अत्याचार व ऍट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर वीट भट्टी चालक कोरेगाव वाडी येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सध्या पोलीस चारही फरार आरोपींचा शोध घेत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close