आपला जिल्हा

क्रूरकर्मा डॉ. सुदाम मुंडे चा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

बीड — जामिनावर सुटलेल्या क्रूरकर्मा डॉ. सुदाम मुंडे याने वैद्यकीय परवाना रद्द केलेला असताना देखील पुन्हा वैद्यकीय व्यवसाय थाटला होता. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने कारवाई करून त्याला जेरबंद केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणात सुदाम मुंडे याचा जामीन अर्ज अंबाजोगाई न्यायालयाने आज फेटाळून लावला.
स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणात दोषी आढळलेला डॉक्टर सुदाम मुंडे जामिनावर काही दिवसासाठी बाहेर आला होता. मात्र पून्हा तो वैद्यकीय परवाना रद्द केलेला असताना देखील मुलीच्या नावाने दवाखाना सुरू करून वैद्यकीय सेवा पुरवत होता.सहा सप्टेंबरला जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाने पोलिसांनी हॉस्पिटल वर छापा मारला.यावेळी तीन कोरूना रुग्ण या ठिकाणी उपचार घेत असल्याचे निदर्शनास आले तसेच गर्भपातासाठी आवश्यक असणारी साधन सामग्री या ठिकाणी आढळून आली. या प्रकरणी अटकेत असलेल्या सुदाम मुंडे ने तपास सुरू असताना आपल्याला पुन्हा जामीन देण्यात यावा असा विनंती अर्ज न्यायालयाकडे केला होता मात्र न्यायालयाने आज जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close