महाराष्ट्र

ऊसतोड मजुरांना ऊसतोडणीच्या ठिकाणी भेटणार स्वस्त धान्य

बीड — जिल्हयातुन दरवर्षी मोठया प्रमाणावर ऊसतोडणीसाठी मजूर पश्चिम महाराष्ट्र तसेच इतर जिल्ह्यामध्ये जात असतात. त्यांना वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ते ज्या ठिकाणी काम करीत असतील तेथील जवळच्या रेशन दुकानात स्वस्त धान्य उपलब्ध होणार आहे.

वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत महाराष्ट्र आंध्र प्रदेश बिहार दादरा नगर हवेली दिव दमन, गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश झारखंड,कर्नाटक , केरळ , मध्यप्रदेश , मिझोरम , ओडीसा , पंजाब , सिक्कीम , राजस्थान , तेलंगणा , त्रिपुरा , उत्तर प्रदेश , जम्मु कश्मिर , मणिपूर , नागालँड , उत्तराखंड यापैकी कोणत्याही राज्यात कोणत्याही राशन दुकानातून स्वतःचा अंगठा पॉस मशीनवर लावून धान्य घेणे शक्य होणार आहे. परंतु वरीलप्रमाणे सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्य प्राप्त करुन घेण्यासाठी पात्र व गरजु लाभार्थ्यांची रेशनकार्डला ऑनलाईन प्रणालीव्दारे आधारलिंक होणे आवश्यक आहे . त्यासाठी बीड जिल्हयातील सर्व गरजू उसतोड मजुरांना आवाहन करण्यात येते की , आपण ज्या तालुक्यातील रहिवासी आहात तेथील तहसिल कार्यालयात जावून रेशनकार्डला आधारलिंक करण्याचे काम पुर्ण करुन घ्यावे . वरीलप्रकारे भेटणारा लाभ हा ‘ वन नेशन वन रेशन ‘ या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी घेऊ शकतात .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close