आपला जिल्हा

चाचण्या कमी, रुग्ण संख्या जास्त, बीड मध्ये सापडले 147 कोरोना रुग्ण

बीड — शुक्रवारी आलेल्या अहवालात कोरोना रुग्णांनी दोनशे आकडा गाठला होता. मात्र शनिवारी 820 जणांच्या अहवालात 147 नवे रुग्ण आढळून आले आहेत. चाचण्यांच प्रमाण घटत असल्याचं तर रुग्णसंख्या वाढत असल्याचं चित्र सध्या पहावयास मिळत आहे 673 जणांचे अहवाल निगेटिव आले आहेत.
अंबाजोगाई– 30
ममदापूर येथे चार अकोला येथे दोन आनंदनगर 2, बलूतेचा मळा तीन, मोरेवाडी 2 रुग्ण सापडले इतर काही भागातील रुग्णांचा देखील यात समावेश आहे.
आष्टी — 21
सोलेवाडी 3, म्हसोबाची वाडी तीन सध्या ते मुंबई येथे आहे मुर्शदपुर मध्ये तीन, केळ सांगवी घुले वस्ती देवी निमगाव बाजारतळ कडा जाधव हॉस्पिटल जवळ कडा याठिकाणी रुग्ण सापडले.
बीड — 53
चौसाळा परिसरात आज देखील सात रुग्ण आढळून आले यामध्ये मोरगाव चौसाळा, रुइगव्हाण हिंगणी बुद्रुक बोरखेड सावरगाव घाट पोत्रा येथील रुग्णांचा समावेश आहे. बीड तालुक्याचा आकडा अर्धशतकाच्या आसपास राहत असल्याचे गेल्या पंधरा दिवसातील अहवालावरून दिसून येत आहे.
धारूर — 8
रुई धारूर येथे तीन पहाडी पारगाव आयोध्या नगर घागरवाडा कसबा विभाग क्रांती चौक याठिकाणी रुग्ण सापडले.
गेवराई — 3
शहरातील मातोश्री नगर गणेश नगर व किनगाव येथे रुग्ण सापडले.
केज — 6
आडस कळम आंबा माधव नगर फुलेनगर मध्ये दोन वकील वाडी केज याठिकाणी रुग्ण सापडले.
माजलगाव — 4
माजलगाव शाहूनगर शिवाजीनगर काडीवडगाव या ठिकाणी नवीन रुग्ण सापडले.
परळी — 11
पोहनेर शेलु मोहा पद्मावती गल्ली टीपीएस कॉलनी मध्ये तीन कन्हेरवाडी 2 सुभाष चौक सुभाष चौक शिवाजी चौक याठिकाणी रुग्ण आढळले. मात्र गेल्या पंधरा-वीस दिवसातील अहवालावर लक्ष दिले असता परळीची रुग्णसंख्या आटोक्यात असल्याचे पाहावयास मिळत आहे.
पाटोदा — 5
शहरात तीन रामवाडी पिंपळवंडी येथे रुग्ण सापडले.
शिरूर — 5
घाटशील पारगाव उखंडा चकला 2 ,मजमा पुरी, रायमोह येथील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
वडवणी — 1
तालुक्यातील खापरवाडी येथे 48 वर्षीय व्यक्तीस कोरोना ची बाधा झाली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close