आपला जिल्हा

पीक कर्जाच्या अर्जासाठी एक महिना मुदत वाढ द्या — बाळासाहेब मोरे

चौसाळा — पिक कर्जाचे प्रस्ताव घेण्याची अंतिम मुदत बँकांनी ३० सप्टेंबर पर्यंत जाहीर केली होती. कोरोनाचे संकट व कागदपत्रे मिळविण्यासाठी लागलेल्या दिरंगाईमुळे तसेच कर्ज माफीच्या यादीत उशिरा नाव आलेले शेतकरी कर्जापासून वंचीत आहेत. त्यांना लाभ मिळण्यासाठी बँकांनी एक महीना मुदत वाढविण्याची गरज आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक कर्ज मिळण्यापासून वंचित राहत असल्याने आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी ३१ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी भाजप किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी केली आहे.
महात्मा फुले कर्जमाफी योजनेत कर्जमाफी मिळालेले सुद्धा अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. ज्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेत कर्ज माफी झाली आहे. त्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर जोपर्यंत कर्ज माफी झालेली रक्कम खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत बँक सदरील शेतकऱ्यांची कर्ज फाईल स्वीकारत नाही. तसेच कर्ज माफी झालेली रक्कम सातबारा वरून कमी करण्यासाठी सर्वसाधारण पणे पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. आणि कोरोनाच्या संकटामुळे अनेक अधिकारी, कर्मचारी कार्यालयात भेटत नाहीत. सदरील परिस्थिती मुळे अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहिले आहेत त्यामुळे जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांची राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ३१ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी भाजपा किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी केली आहे. पीककर्ज मुदत वाढीसाठी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचे बाळासाहेब मोरे यांनी सांगितले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close